Salman Khan | शर्लिन चोप्राच्या निशाण्यावर सलमान खान, थेट अभिनेत्याला म्हणाली…
बिग बॉस 16 सुरूवातीपासूनच वादग्रस्त ठरतंय. निर्माते या सीजनला खास बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. बिग बॉस 15 टीआरपीमध्ये काही खास कमाल करू शकले नव्हते.
मुंबई : रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) सध्या वादात सापडले आहे. घरातील टीव्ही स्टार सेलिब्रेटी नसलेल्या इतर स्पर्धकांचा क्लास काढत असल्याने सोशल मीडियावर बिग बॉसविरोधात रोष वाढतोय. त्यामध्येच आता साजिद खानच्या (Sajid Khan) बिग बॉसमधील सहभागामुळे वाद वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. साजिद खान बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. अनेक अभिनेत्रींनी पुढे येत बिग बॉसच्या घरात साजिद खान सहभागी झाल्याने नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर केल्या.
बिग बॉस 16 सुरूवातीपासूनच वादग्रस्त ठरतंय. निर्माते या सीजनला खास बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. बिग बॉस 15 टीआरपीमध्ये काही खास कमाल करू शकले नव्हते. यामुळे निर्मात्यांनी सुरूवातीपासूनच कंबर कसलीये. मात्र, साजिद खान बिग बॉसमध्ये आल्याने अनेकांनी बिग बॉसच्या निर्मात्यांवर थेट टीका केली. परंतू आता या वादामध्ये एका अभिनेत्रीने थेट सलमान खानवर टीका केलीये.
Me tooची शिकार ठरलेली अभिनेत्री शर्लिन चोप्रा म्हणाली की, बिग बॉसच्या निर्मात्यांनी महिलांचा विनयभंग करणे किंवा चुकीच्या ठिकाणी स्पर्श करणे हे योग्य असल्याचा एक संदेशच लोकांना दिलाय. कारण लोकांच्या नजरेत यांना निर्दोष ठरवले जाणार आहे. कारण त्यांच्यावर मोठे मेकर्स आणि चॅनेलची कृपा आहे. शार्लिनने फक्त बिग बॉसच्या निर्मात्यांवरच नाही तर सलमान खानवर देखील टीका केलीये.
शर्लिन चोप्रा म्हणाली, गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉसला होस्ट करणाऱ्या सलमान खानला नेमके काय झाले हे मला कळत नाहीये. या प्रकरणात तो कसा शांत बसू शकतो हेच मला मुळात कळत नाहीये. सर्वजण सलमानला भाईजान नावाने ओळखतात आणि तो सर्वांचा भाईजान देखील आहे. मग आमच्या सारख्यांसाठी सलमान भाईजान होऊ शकत नाही का? का फक्त सलमान प्रभावशाली लोकांसाठीच भाईजान आहे? आमच्यासारख्या लोकांसाठी नाही का?