Video | उर्फी जावेद साजिद खानवर भडकली, म्हणाली हा फक्त…
बिग बॉस 16 मध्ये साजिद खानला पाहून अनेकांनी चॅनलवर भडास काढलीये. उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करत साजिद खानचा समाचार घेतलाय.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडियावर तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी उर्फी जावेद (Urfi javed) सध्या चर्चेत आहे. उर्फीच्या निशाण्यावर साजिद खान (Sajid Khan) आहे. साजिद खान बिग बॉस 16 मध्ये सहभागी झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केलाय. आता या सर्व प्रकरणात उर्फी जावेदनेही उडी घेतलीये. उर्फी जावेदने एक व्हिडीओ (Video) शेअर करत साजिद खानविरोधात परखड मत व्यक्त केलंय. अनेक महिलांनी यापूर्वी साजिद खानवर MeToo चा आरोप केलाय.
बिग बॉस 16 मध्ये साजिद खानला पाहून अनेकांनी चॅनलविरोधात रोष व्यक्त केला. उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करत साजिद खानचा समाचार घेतलाय. उर्फी जावेद म्हणाली की, साजिद खानने आतापर्यंत कधीच MeToo च्या शिकार झालेल्या मुलींची माफी मागितली नाहीये. दरवेळी तो फक्त मी किती निर्दोष आहे आणि स्वत: चा बचाव करतो.
MeToo च्या शिकार झालेल्या मुलींची आतापर्यंत एकदाही साजिद खानने माफी मागितली नाहीये. कधीच देशाची देखील माफी मागितली नाहीये. याप्रकरणात तो फक्त आणि फक्त स्वत:ला वाचवण्याचाच प्रयत्न करतो. इतकेच नाही तर त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला काहीच वाटत नाही असेही उर्फी जावेद म्हणाली आहे. साजिद खानला बिग बॉस 16 मध्ये पाहून अनेकांना मोठा धक्काच बसला होता.