Salman Khan| दबंग खानलाही ईडीची भीती वाटते, वाचा काय घडले?

इतकेच नाही तर बिग बॉसच्या घरात दाखल होणाऱ्या काही स्पर्धकांचे प्रोमो देखील पुढे आले आहेत. मात्र, अजूनही संपूर्ण यादी मिळू शकली नाहीये.

Salman Khan| दबंग खानलाही ईडीची भीती वाटते, वाचा काय घडले?
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 7:27 AM

मुंबई : रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. बिग बॉसबद्दल चाहत्यांमध्ये कायमच एक उत्सुकता असते. बिग बॉस 16 ला देखील बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार सलमान खान होस्ट करणार आहे. बिग बॉस 16 मध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये कमाली उत्सुकता बघायला मिळत आहे. इतकेच नाही तर बिग बॉसच्या घरात दाखल होणाऱ्या काही स्पर्धकांचे प्रोमो देखील पुढे आले आहेत. मात्र, अजूनही संपूर्ण यादी मिळू शकली नाहीये. मात्र, बिग बॉस 16 सध्या एका वेगळ्याच चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे सलमान खानची (Salman Khan) बिग बॉस 16 ची फीस…

काही दिवसांपूर्वीपासून सोशल मीडियावर सलमान खानने बिग बॉस 16 मध्ये होस्ट करण्यासाठी तब्बल 1000 कोटी फीस घेतल्याची चर्चा सुरू होती. आता त्यावर स्वत: सलमान खानने खुलासा केलाय.

सलमान खान म्हणाला की, काय म्हणत आहात? 1000 कोटी ? इतकी फी मला माझ्या आयुष्यात कधीच मिळाली नाहीये. मला जर खरोखरच इतकी जास्त फी मिळाली तर मी आयुष्यात कधी कामच करणार नाही मग….सलमान खान पुढे म्हणाला की, हो हे खरे आहे की, माझे खूप जास्त खर्च आहेत.

या सर्व बातम्या फक्त प्रेक्षक आणि चाहतेच वाचत नाही तर इन्कम टॅक्स आणि ईडीचे लोकही वाचतात…मग त्यांच्या निशाण्यावर मी येतो आणि मग ते मला भेटायला येतात…मग त्यांना ही या सर्व अफवा असल्याचे कळते.

ही अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरवली जात आहे की, यंदाच्या सीजनसाठी सलमान खानने 1000 कोटी रुपयांची मागणी बिग बाॅसच्या निर्मात्यांकडे केली आहे.

बिग बॉस 15 साठी सलमान खानने 350 कोटी घेतले होते आणि यंदा सलमानने फी वाढून 1000 कोटी फी बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घेतलीये. यावर आता सलमान खानने स्पष्टीकरण दिले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.