Bipasha Basu: बिपाशा बासू लवकरच देणार ‘गुड न्यूज’; लग्नाच्या 6 वर्षांनंतर करण-बिपाशाच्या घरी हलणार पाळणा!

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर यांची पहिली भेट भूषण पटेलच्या 'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Bipasha Basu: बिपाशा बासू लवकरच देणार 'गुड न्यूज'; लग्नाच्या 6 वर्षांनंतर करण-बिपाशाच्या घरी हलणार पाळणा!
Bipasha Basu: बिपाशा बासू लवकरच देणार 'गुड न्यूज'Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 5:01 PM

अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) लवकरच आई होणार आहे. बिपाशा आणि करण सिंग ग्रोवर (Karan Singh Grover) यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. याबाबत अद्याप दोघांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी लवकरच दोघंही चाहत्यांना गुड न्यूज देतील अशी अपेक्षा आहे. बिपाशाच्या गरोदरपणाची (Pregnant) बातमी ऐकून चाहते खूपच उत्सुक आहेत. या दोघांच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत. बिपाशा आणि करणने एप्रिल 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या सहा वर्षांनंतर या दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. या दोघांना बॉलिवूड इंडस्ट्रीतील आदर्श जोडी मानली जाते.

बिपाशा आणि करण नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे रोमँटिक फोटो पोस्ट करत असतात. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर यांची पहिली भेट भूषण पटेलच्या ‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. दोघांनी 2015 मध्ये डेट करायला सुरुवात केली आणि त्याच्या पुढच्या वर्षी लग्न केलं.

हे सुद्धा वाचा

बिपाशा आणि करणने अद्याप गरोदरपणाची बातमी जाहीर केली नाही. चाहत्यांच्या या दोघांकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. बिपाशा 2015 नंतर मोठ्या पडद्यावर दिसली नाही. 2020 मध्ये तिला ‘डेंजरस’ या वेब सीरिजमध्ये पाहिलं गेलं. तर करण शेवटचा ‘कुबूल है’ या मालिकेत दिसला होता. बिपाशाने 2001 मध्ये ‘अजनबी’ चित्रपटातून बॉलिबूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिला खलनायिकेची भूमिका मिळाली. पण तिची खलनायिकेची भूमिका लोकांना इतकी आवडली की लोकांनी तिचं कौतुक केलं. बिपाशाने राज, जिस्म, मेरे यार की शादी, चोर मचाये शोर, जमीन, बरसात यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तर करण हा छोट्या पडद्यावरून प्रकाशझोतात आला. ‘दिल मिल गये’ या मालिकेतून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

आठवीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी अन्
आठवीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी अन्.
'...यांच्या विजयाचा बाप लावारिस', बोगस मतदानावर 'सामना'तून हल्लाबोल
'...यांच्या विजयाचा बाप लावारिस', बोगस मतदानावर 'सामना'तून हल्लाबोल.
जरांगेंची तब्येत खालावली, तरी उपोषणावर ठाम; सरकारकडे या मागण्या अन्...
जरांगेंची तब्येत खालावली, तरी उपोषणावर ठाम; सरकारकडे या मागण्या अन्....
भाजप दादांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना फोडणार? राऊतांचा दावा काय?
भाजप दादांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना फोडणार? राऊतांचा दावा काय?.
आकाला 'स्पेशल 26' पोलिसांचं प्रोटेक्शन? बीड पोलीस दलात कराडची टीम
आकाला 'स्पेशल 26' पोलिसांचं प्रोटेक्शन? बीड पोलीस दलात कराडची टीम.
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार.
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली.
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप.