Shah Rukh Khan | शाहरुख खान याच्या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज

वाढदिवसाच्या दिवशी शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना अत्यंत मोठे गिफ्ट दिले आहे.

Shah Rukh Khan | शाहरुख खान याच्या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 1:27 PM

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस मोठा आणि आनंदाचा आहे. कारण आज शाहरुख खानचा 57 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना अत्यंत मोठे गिफ्ट दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानचे चाहते बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पठाण चित्रपटाची वाट पाहात आहेत. शाहरुख खान या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे.

आजच्या या खास दिवशी शाहरुख खानने चाहत्यांना सरप्राईज गिफ्ट देत पठाण चित्रपटाचे टीझर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पठाण चित्रपटाचे टीझर आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर टीझर रिलीज झाल्यापासून पठाण चित्रपट ट्रेंडमध्ये आहे.

पठाण चित्रपटाचा टीझर रिलीज करताना शाहरुखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले की, आपल्या खुर्चीची पट्टी बांधा… पठाण टीझर आऊट. पठाणला 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये सिनेमागृहात पाहा. पठाणचा रिलीज झालेला टीझर अॅक्शन आणि रोमान्सने भरलेला आहे.

टीझरमध्ये शाहरुख खान जबरदस्त अॅक्शनमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर जॉन अब्राहम आणि किंग खान यांच्यातही अॅक्शन पाहायला मिळत आहे. याशिवाय शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची केमिस्ट्रीही जबरदस्त दिसत आहे. पठाण चित्रपटाचा टीझर चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसत आहे.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.