चित्रपटासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करण्याच्या नादात ‘या’ अभिनेत्याला थेट जावे लागले दवाखान्यात, वाचा नेमके काय घडले?
फवादने आमिर खानकडून प्रेरणा घेतली होती. मात्र, यामध्ये त्याला यश मिळाले नाही आणि आवाक्या बाहेर वजन वाढल्याने रूग्णालयात दाखल व्हावे लागले.
मुंबई : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) सध्या जोरदार चर्चेत आहे. फवादचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीली येणार आहे. मात्र, यावेळी फवाद हा चित्रपटामुळे (Movie) चर्चेत नसून त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आलांय. फवाद खानने नुकताच एक मुलाखत (Interview) दिलीये. या मुलाखतीमध्ये फवादने अत्यंत मोठा खुलासा केलांय. फवादच्या या खुलाशाने अनेकांना मोठा धक्काच बसलांय. फवाद खान आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत राहतो. यावेळीही त्यांने केलेल्या एका विधानानंतर चर्चेत आलाय.
आमिर खानसारखे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करण्याच्या नादात हा अभिनेता गेला थेट दवाखान्यात
फवाद खानने द लीजेंड ऑफ मौला जट्ट या चित्रपटासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आमिर खानसारखे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर पुढे काय झाले हे स्वत: फवाद याने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. द लीजेंड ऑफ मौला जट्ट या चित्रपटात फवादला एका फायटरची भूमिका साकारायची असल्याने त्याने आपले 75 किलो वजन चक्क 100 किलोवर नेले. मात्र, त्यानंतर त्याला थेट रूग्णालयात दाखल व्हावे लागले असल्याचे फवादने सांगितले.
बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर मधुमेहाची लागण
फवादने आमिर खानकडून प्रेरणा घेतली होती. मात्र, यामध्ये त्याला यश मिळाले नाही आणि आवाक्या बाहेर वजन वाढल्याने रूग्णालयात दाखल व्हावे लागले. फवादने पुढे बोलताना सांगितले की, या वजन वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे त्याच्या आरोग्यावर खतरनाक परिणाम झाला. यामुळे फवादला मधुमेह देखील झाला. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे फवादला बरे होण्यासाठी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागलाय. फवादने सांगितले की, या वजन वाढवण्याच्या प्रक्रियेत माझ्या शरीरावर खूप घातक परिणाम झाले.