Aamir Khan Kiran Rao Divorce | घटस्फोटाच्या घोषणेनंतर 24 तासात आमिर-किरणचं एकत्र फेसबुक लाईव्ह
पानी फाऊण्डेशनतर्फे आयोजित 'सोयाबीनची डिजिटल शेती शाळा' उपक्रमात आमीर आणि किरण एकत्र सहभागी झाले. घटस्फोटानंतरही चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये सहकारी म्हणून काम सुरु ठेवणार असल्याचं आमिरने आधीच स्पष्ट केलं होतं.
मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ख्याती असलेला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) याने पत्नी किरण राव (Kiran Rao) सोबत घटस्फोट घेत असल्याची घोषणा करत एकच खळबळ उडवून दिली. आमीरच्या घोषणेला 24 तासही उलटत नाहीत, तोच आमीर आणि किरण यांचं एकत्र फेसबुक लाईव्ह पाहायला मिळत आहे. निमित्त आहे ते शेती शाळेचं. पानी फाऊण्डेशनतर्फे आयोजित ‘सोयाबीनची डिजिटल शेती शाळा’ उपक्रमात आमीर आणि किरण एकत्र सहभागी झाले. (Bollywood Actor Aamir Khan And Wife Kiran Rao Facebook Live after Divorce)
पानी फाऊंडेशनसाठी फेसबुक लाईव्ह
आमिर खान आणि किरण राव यांनी फेसबुक लाईव्हला सुरुवात केली. त्यानंतर दिग्दर्शक सत्यजीत भटकळ, डीएल मोहिते, डॉ. आरएस जाधव सहभागी झाले. त्याचप्रमाणे आंबेजोगाईतील उंबेफळ गावातून सविता तोडकरही यामध्ये लाईव्ह सहभागी झाल्या. घटस्फोटानंतरही चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये सहकारी म्हणून काम सुरु ठेवणार असल्याचं आमिरने आधीच स्पष्ट केलं होतं. त्याचा प्रत्यय या निमित्ताने आला.
पाहा फेसबुक लाईव्ह
आमिर-किरणचं संयुक्त निवेदन
आमिर खान आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली. गेल्या 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
संयुक्त निवेदनात म्हटल्याप्रमाणे आमिर खान आणि किरण राव आझादचा संयुक्तपणे सांभाळ करणार आहेत. आझादचे संगोपन आणि पालनपोषण आम्ही एकत्रच करू, असे आमिर आणि किरण रावने म्हटले आहे.
AAMIR KHAN – KIRAN SEPARATE… JOINT STATEMENT… pic.twitter.com/YlixZbvtIA
— taran adarsh (@taran_adarsh) July 3, 2021
2005 मध्ये विवाहबंधनात
‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने 28 डिसेंबर 2005 सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर 2011 मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांचा मुलगा आझादचा जन्म झाला होता. आमिर खानला पहिली पत्नी रिया दत्तापासून दोन मुलं आहेत, आयरा खान आणि जुनैद खान.
संबंधित बातम्या :
(Bollywood Actor Aamir Khan And Wife Kiran Rao Facebook Live after Divorce)