रक्ताने पत्र लिहिलं, पळून जाऊन लग्न ते घटस्फोट, आमिरच्या पहिल्या लग्नाची कहाणी

एका इंटरव्ह्यूमध्ये आमिरने रिनासोबत घटस्फोट, त्यांचे एकमेकांसोबतचे संबंध याबाबतची माहिती दिली होती. (Bollywood Actor Aamir Khan first Divorce And Relation With Ex Wife Reena Dutta know Relationship)

रक्ताने पत्र लिहिलं, पळून जाऊन लग्न ते घटस्फोट, आमिरच्या पहिल्या लग्नाची कहाणी
aamir khan reena dutta
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 1:41 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान-किरण रावच्या घटस्फोटाच्या वृत्ताने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोघांनी सहमतीने वेगळे होत असल्याचं म्हटलं आहे. (Bollywood Actor Aamir Khan first Divorce And Relation With Ex Wife Reena Dutta love story)

लग्नानंतर तब्बल 16 वर्षांनी घटस्फोट

आमिर खानला बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शन्सिट या नावाने ओळखले जाते. आमिर खान कामाच्या बाबत जरी परफेक्ट असला, तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक उतार चढाव आले आहेत. आमिर खानच्या करिअरच्या सुरुवातीला वयाच्या 21 व्या वाढदिवसाला रीना दत्ता हिच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर तब्बल 16 वर्षांनी म्हणजेच 2002 मध्ये त्या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता.

रिना दत्तासोबत घटस्फोट झाल्यानंतर आमिर खान हा फार अस्वस्थ होता. एका इंटरव्ह्यूमध्ये आमिरने रिनासोबत घटस्फोट, त्यांचे एकमेकांसोबतचे संबंध याबाबतची माहिती दिली होती. रिना आणि मी फार तरुण वयात एकमेकांसोबत लग्न केले. ते 16 वर्ष एकत्र होते. ज्यावेळी त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्या दोघांसोबतच कुटुंबालाही धक्का बसला. त्याला यातून बाहेर पडण्यासाठी दोन वर्ष लागले.

“रिनाने तिच्या आयुष्याची बरीच वर्षे त्यांच्याबरोबर घालविली आणि मला आयुष्याचा भाग होण्याची संधी दिली, याबद्दल मी तिचे आभारी आहे. रिना खूप खास आहे आणि त्याच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे आणि नेहमीच राहिल.” असे आमिर खान म्हणाला होता.

आमिर आणि रिनाची लव्हस्टोरी

आमिर आणि रिनाच्या घराच्या खिडक्या एकमेकांच्या समोरासमोर होत्या. ते दोघं नेहमीच एकमेकांना पाहात असायचे. आमिर हा रिनाच्या प्रेमात पडला होता. त्याने तिला प्रपोजही केले होतं. मात्र रिनाने नेहमीच त्याला नकार दिला. विशेष म्हणजे आमिरने रिनाला एकदा रक्ताने पत्रही लिहिलं होतं. मात्र त्यानंतरही रिनाने त्याचे न ऐकताच तू असं करु नकोस असे सांगितले.

यानंतर आमिरने तिच्या मागे मागे करणं बंद केले. पण यानंतर रिना आमिरच्या प्रेमात पडली. आमिर खानच्या 21 व्या वाढदिवसाला रजिस्ट्रार ऑफिसला घरातून पळून जाऊन लग्न केले होतं. आमिर खानला पहिली पत्नी रिया दत्तापासून आयरा खान आणि जुनैद खान अशी दोन मुलं आहेत.

लग्नानंतर तब्बल 16 वर्षांनी म्हणजेच 2002 मध्ये ते दोघं वेगळे झाले. त्यांनी घटस्फोट का घेतला, त्याचे नेमके कारण काय? याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्या दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतर ते एकमेकांविषयी काहीही बोलले नाहीत. “कायदेशीररित्या आम्ही वेगळे झालो असलो तरी एक कागदाचा तुकडा आमच्यातील नातं संपवू शकत नाही,” असे आमिर घटस्फोटानंतर म्हणाले होता. या घटस्फोटानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2005 मध्ये आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. त्या दोघांना आझाद नावाचा एक मुलगा आहे.

(Bollywood Actor Aamir Khan first Divorce And Relation With Ex Wife Reena Dutta love story)

संबंधित बातम्या : 

Amir Khan Kiran Rao Divorce | अभिनेता आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट, किरण रावसोबत 15 वर्षांनी काडीमोड

Aamir Khan Kiran Rao Divorce | पहिल्या पत्नीचं ‘ते’ पत्र वाचून ढसाढसा रडला आमिर खान, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Amir Khan Kiran Rao Divorce: हा शेवट नव्हे तर सुरुवात; आमिर खान-किरण रावच्या मुलाचा ताबा आता कोणाकडे?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.