Akshay Kumar Mother Death | अक्षय कुमारला मातृशोक, उपचारादरम्यान अरुणा भाटियांचे निधन

माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती, अशा शब्दात अक्षयने आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिली आहे.

Akshay Kumar Mother Death | अक्षय कुमारला मातृशोक, उपचारादरम्यान अरुणा भाटियांचे निधन
अक्षय कुमार आणि त्याची आई
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 9:46 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याला मातृशोक झाला आहे. अक्षयकुमारच्या आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून शूटिंग सोडून मुंबईलाही परतला. मात्र अवघ्या दोनच दिवसात ही दुःखद बातमी आली.

इन्स्टाग्रामवर अक्षय कुमारची भावूक पोस्ट

ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती, अशा शब्दात अक्षयने आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिली आहे.

पाहा अक्षयची इन्स्टाग्राम पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून आपल्या आईसाठी चाहत्यांना दुवा करा, असं म्हटलं होतं. माझ्या आईच्या तब्येतीबद्दल विचारल्याबद्दल सर्वांचे आभार. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे. प्रत्येक तास माझ्यासाठी कठीण आहे. तुमच्या सर्वांची प्रार्थना माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असं अक्षय कुमारने आईच्या आजारपणादरम्यान म्हटलं होतं.

कामावर परिणाम होऊ दिला नाही!

अक्षयला त्याचे काम मध्येच सोडणे कधीच आवडत नाही. तो अर्थातच भारतात परतला आहे, पण त्याने निर्मात्यांना शूटिंग चालू ठेवण्यास सांगितले आहे आणि ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती शूट करायला सांगितली आहेत. त्याच्या उर्वरित कामाची कमिटमेंट देखील चालू आहे. वैयक्तिक त्रास कितीही असला, तरी त्याचा परिणाम कामावर होणार नाही याची काळजी तो नेहमीच घेतो.

‘बेल बॉटम’ चाहत्यांच्या पसंतीस

नुकतीच चित्रपटगृहे उघडल्यानंतर अक्षय कुमारने आपला ‘बेल बॉटम’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अक्षयचा अभिनय आणि लूक चित्रपटात चांगलाच गाजला आहे.

अक्षयच्या चित्रपटांची रांग!

अक्षय कुमारने नुकतेच आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे प्रमोशन अक्षय त्याच्या खास स्टाईलमध्ये करतो आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.

‘राम सेतु’चे चित्रीकरण सुरु करणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय ऑक्टोबरमध्ये ‘राम सेतु’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल आणि या वर्षी डिसेंबरपर्यंत चित्रपट पूर्ण करेल. अक्षयने मार्चमध्ये अयोध्येत या चित्रपटाचा मुहूर्त केला होता. यानंतर, त्याला मुंबईत चित्रपटाचे एक लांब शेड्यूल शूट करायचे होते, परंतु लॉकडाऊनमुळे ते शूटिंग पुढे ढकलण्यात आले. अहवालांनुसार, चित्रपटाचा काही भाग श्रीलंकेत शूट केला जाणार होता, परंतु चित्रपट निर्मात्यांनी आता आपली योजना बदलली आहे.

केरळमधील चित्रीकरण रद्द

त्याच वेळी, केरळमध्ये ‘राम सेतु’ चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता, परंतु हे राज्य कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याने, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता चित्रपटाचा एक मोठा भाग गुजरातमध्ये शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त नुसरत भरूचा आणि जॅकलिन फर्नांडिस देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

अभिषेक शर्मा ‘राम सेतु’ दिग्दर्शित करत आहेत. तसे, ‘राम सेतु’ व्यतिरिक्त, अक्षय कुमारच्या हातात अनेक चित्रपट आहेत. त्याने यापूर्वी ‘पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘अतरंगी रे’साठी चित्रीकरण केले आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘बच्चन पांडे’ आणि ‘सूर्यवंशी’ सारखे अनेक चित्रपट आहेत.

हेही वाचा :

‘बिग बॉस तेलुगु’च्या घराची धुरा ‘मास’च्या हाती, पाहा एका भागासाठी किती मानधन आकारतो नागार्जुन अक्किनेनी

 अक्षय कुमार पुढचे दोन महिने गुजरातमध्ये, सुरु करणार ‘राम सेतु’चं नवं शेड्युल!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.