सततच्या फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारने घेतला अत्यंत मोठा निर्णय, व्हिडीओ शेअर करत म्हटले की…
म्हणावा तसा प्रतिसाद अक्षय कुमारच्या चित्रपटांना सध्या मिळत नाहीये. मात्र, असे असले तरीही अक्षय कुमार प्रचंड चर्चेत आहे.
मुंबई : दिवाळीच्या दिवशी अक्षय कुमारचा राम सेतू हा चित्रपट रिलीज झाला. त्यापूर्वी सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट रिलीज झाला होता. म्हणावा तसा प्रतिसाद अक्षय कुमारच्या चित्रपटांना सध्या मिळत नाहीये. मात्र, असे असले तरीही अक्षय कुमार प्रचंड चर्चेत आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार आला होता. त्यावेळी अक्षय कुमारने मान्य केले की, चित्रपट चालत नाहीयेत. मजाकमध्ये कपिल शर्माला अक्षय कुमार म्हणतो की, माझ्या चित्रपटांना या कपिलची नजर लागलीये. माझे चित्रपट सातत्याने फ्लाॅप जात आहेत.
Kuchh naya karne mein jo mazza hai uski baat hi kuchh aur hai. More on this soon… pic.twitter.com/v2FoP2HjGY
— Akshay Kumar (@akshaykumar) November 9, 2022
बाॅक्स आॅफिसवर चित्रपट धमाका करताना दिसत नसतानाच आता अक्षय कुमारची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरलीये. नुकताच अक्षय कुमार याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टसोबत अक्षयने एक व्हिडीओही शेअर केलाय. अक्षयची ही पोस्ट आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
अक्षय कुमारने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, काही तरी नवे करण्यासाठी जातोय, खूप मेहनत घेतलीये आणि खास गोष्ट आहे…बघा…अक्षय कुमारला नेमके काय म्हणायचे आहे, हे अजून कळू शकले नाहीये. मात्र, अक्षय नक्कीच त्याच्या नव्या चित्रपटाबद्दल बोलत असल्याचा एक अंदाजा काढला जातोय. आता अक्षय नेमके काय नवीन करतोय, याची उत्सुकता चाहत्यांना लागलीये.