Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kashmir Files Movie : अनुपम खेर यांच्या ‘द कश्मीर फाईल्स’चा ट्रेलर आऊट, ‘या’ तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार

'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट आता 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे. अभिनेते अनुपम खेर, अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्यासारखी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

The Kashmir Files Movie : अनुपम खेर यांच्या 'द कश्मीर फाईल्स'चा ट्रेलर आऊट, 'या' तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार
द कश्मीर फाईल्स
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 4:10 PM

मुंबई : ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files Movie) हा चित्रपट आता 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट मागच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट येत्या 11 मार्चला प्रदर्शित होतोय. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसंच अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यासारखी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आहे. अनुपम खेर यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘तुम्हा सर्वांसाठी ‘द कश्मीर फाईल्स’ लवकरच मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहोत. हा चित्रपट 11 मार्च 2022 ला रिलीज होणार आहे.’

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

चित्रपटातील कलाकार

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट येत्या 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळणार आहेत.

कश्मीरी पंडिताच्या जीवनावर आधारित चित्रपट

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट कश्मीरी पंडिताच्या जीवनावर आधारित आहे. 1989 आणि 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर हा सिनेमा भाष्य करतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ कश्मीरी पंडिताच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट येत्या 11 मार्चला प्रदर्शित होतोय. त्यामुळे या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पहावं लागेल.

संबंधित बातम्या

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रदर्शनासाठी आलियाचा हटके अंदाज, फोटो शेअर करत म्हणाली…

Mouny Roy Honeymoon Photos : अभिनेत्री मौनी रॉय काश्मिरमध्ये करतेय हनिमून इन्जॉय, तिचे बर्फातले फोटो बघाच!

Jhund Teaser : एक झलक सबसे अलग, अमिताभ बच्चन यांची ‘झुंड’ स्टाईल, नागराज मंजुळेंकडून नवा टीझर शेअर

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.