AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Funny Video | बॉबी देओलला कित्येक वर्षांपूर्वीच माहित होता ‘कोरोना’, ऐश्वर्याची केली होती स्वॅब टेस्ट! पाहा भन्नाट व्हिडीओ

बॉबी देओलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉबीच्या काही चित्रपटातील दृश्ये एकत्रित करून हा मजेशीर व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.

Funny Video | बॉबी देओलला कित्येक वर्षांपूर्वीच माहित होता ‘कोरोना’, ऐश्वर्याची केली होती स्वॅब टेस्ट! पाहा भन्नाट व्हिडीओ
बॉबी देओल
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 11:57 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा दुसरी इनिंग खेळत आपले नशीब आजमावत आहे. वेब सीरीजच्या माध्यमातून पदार्पण करत गेल्या काही काळात बॉबी देओलने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो एक शक्तिशाली अभिनेता आहे. दरम्यान, बॉबी देओलचा एक मजेदार मीम व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो कोरोनाच्या नियमांशी  तंतोतंत जुळणारा असून, सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे (Bollywood Actor Bobby Deol corona guidelines funny video).

बॉबी देओलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉबीच्या काही चित्रपटातील दृश्ये एकत्रित करून हा मजेशीर व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.

काय आहे ‘या’ व्हिडीओत?

वास्तविक, जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत, नेटकऱ्यांनी बॉबी देओलच्या काही चित्रपटांच्या वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र जोडून एक भन्नाट व्हिडीओ तयार केला आहे.  ज्यामध्ये बॉबी देओल कोरोनाचे सगळे नियम पाळून सर्व काम करत आहेत आणि म्हणत आहेत की, आजकाल कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सांगितले जात आहे. बॉबी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरला आहे.

‘कहीं ये बीमारी मुझे भी न लग जाए’

हा व्हिडीओ बॉबी देओलच्या एका फॅन अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरूवातीस बॉबी देओल म्हणतो, ‘क्योंकि मैं वो साफ साफ देख सकता हूं, जो आप नहीं देख सकते.’ यानंतर हा व्हिडीओ सोशल डिस्टेंसिंगशी कनेक्ट होत असल्याचे दाखवले आहे. जेथे बॉबी देओल सनी देओलला म्हणतो, ‘हाथ मत लगाना भैया, कहीं ये बीमारी मुझे भी न लग जाए।’ (Bollywood Actor Bobby Deol corona guidelines funny video)

ऐश्वर्या रायची स्वॅब टेस्ट

व्हिडीओमध्ये पुढे बॉबी देओल आणि ऐश्वर्या राय यांच्या चित्रपटातील एक दृश्य आहे, जे कोव्हीडच्या स्वॅब टेस्टशी जोडले गेले आहे. व्हिडीओमध्ये असे दिसते आहे की, बॉबी देओल ऐश्वर्याला म्हणतो, ‘प्यार से नहीं तो जबरदस्ती ही सही, छींको… छींको..‘

मास्क, क्वारंटाईन और हँड वॉश

या व्हिडीओ पुढे बॉबी देओलने एक मास्क घातलेला आहे आणि दुसऱ्या एका दृश्यात बॉबी देओल घराला अनेक कुलूप लावत असलेले दाखवले आहे. स्कॉर्पियन चित्रपटाच्या दृश्यात बॉबी देओल घरात अनेक कुलपे लॉक करताना दिसला होता. हे दृश्य क्वारंटाईन जोडण्यात आले आहे. त्याचवेळी पुढे बॉबी देओल आपले हात धुताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगवान व्हायरल होत आहे.

पाहा ‘हा’ भन्नाट व्हिडीओ

(Bollywood Actor Bobby Deol corona guidelines funny video)

हेही वाचा :

Rashmika Mandanna | बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना, लवकरच चित्रीकरणाला होणार सुरुवात!

‘होणार सून मी..’ आधी तब्बल तीन मालिका, बॉलिवूड डेब्यूमध्येच किसिंग सीन, लाडकी सून तेजश्री प्रधानचा प्रवास

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.