‘तुम्ही आमच्यात नाही, यावर विश्वासच बसत नाहीय…’, मिल्खा सिंहंच्या आठवणीने फरहान अख्तर भावूक!

‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंह (Milkha Singh) यांचे शुक्रवारी (18 जून) निधन झाले. मिल्खा सिंह यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच वेळी मिल्खा सिंह यांच्या जाण्याने पडद्यावर ‘मिल्खा सिंह’ साकारलेल्या अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) याला मोठा धक्का बसला आहे.

‘तुम्ही आमच्यात नाही, यावर विश्वासच बसत नाहीय...’, मिल्खा सिंहंच्या आठवणीने फरहान अख्तर भावूक!
फरहान अख्तर आणि मिल्खा सिंह
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 10:53 AM

मुंबई : ‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंह (Milkha Singh) यांचे शुक्रवारी (18 जून) निधन झाले. मिल्खा सिंह यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच वेळी मिल्खा सिंह यांच्या जाण्याने पडद्यावर ‘मिल्खा सिंह’ साकारलेल्या अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) याला मोठा धक्का बसला आहे. फरहानने मिल्खा यांच्यासाठी एक भावूक संदेश लिहिला आहे, ज्याद्वारे त्याने आपले मिल्खा सिंह यांच्यावर किती प्रेम होते, हे सांगितले आहे (Bollywood Actor Farhan Akhtar Share an emotional post for Late Milkha Singh).

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने मिल्खा सिंह यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिलं, ‘प्रिय मिल्खा सिंह, तुम्ही आता आमच्यात नाहीत, यावर माझा विश्वास बसत नाहीय. कदाचित हा माझ्या मनाचा एक भाग असेल, जो तुमच्याकडून मला मिळाला आहे. हे सत्य आहे की, आपण नेहमीच आमच्यात जिवंत राहाल, कारण तुमचे हृदय खूप मोठे होते आणि आपण मातीशी जोडलेले होतात.’

फरहानने पुढे लिहिले की, ‘तुम्ही स्वप्नांना सत्यात उतरवलंत. कठोर परिश्रम, सत्यता आणि दृढनिश्चयाने आपण आपल्या जमीनवर पाय रोवून आकाशाला कसे स्पर्श करू शकता, हे आम्हाला शिकवलंत. आपण आमच्या सर्वांच्या जीवनास स्पर्श केला आहे. जे तुम्हाला एक पिता आणि मित्र म्हणून ओळखत असत, त्यांच्यासाठी हा आशीर्वाद आहे. मी मनापासून तुमच्यावर प्रेम करतो. ‘

वाचा फरहान अख्तर यांचे ट्विट

अभिनेता फरहान आणि मिल्खा सिंह हे मिल्खा सिंह यांच्या बायोपिकचे काम सुरु असताना एकमेकांच्या सानिध्यात राहिले होते. मिल्खा सिंह यांच्यावर बनलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात फरहानने मिल्खा सिंहची भूमिका साकारली होती. फरहानने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती आणि यादरम्यान तो मिल्खा सिंह यांच्या जवळ आला आणि त्यांच्याबद्दल त्याला सर्व माहिती जाणून घेता आली.

मिल्खा यांनी केले फरहानचे कौतुक

मिल्खा सिंह यांनी एका मुलाखतीत फरहानचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की, ‘अमेरिका किंवा इंग्लंड, मी जिथेही जातो तिथे मला भेटणारा प्रत्येकजण म्हणतो की, फिल्ममध्ये फरहान अख्तर हुबेहूब माझ्यासारखा दिसला आहे.’

मिल्खा सिंह पुढे म्हणाले होते की, ‘मी स्वत: ट्रेनिंग दरम्यान फरहान अख्तरला भेटायला गेलो होतो. मी पाहिले होते की, तो केवळ 11 सेकंदात 100 मीटर धावत आला होता. तो एक प्रोफेशनल धावपटू नाही, परंतु त्याने खूप कठोर प्रशिक्षण घेतले होते’.

(Bollywood Actor Farhan Akhtar Share an emotional post for Late Milkha Singh)

हेही वाचा :

‘आम्ही एका महान खेळाडूला गमावून बसलो’, मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी भावूक

Milkha Singh: ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं निधन, कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.