आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडौमोडींमुळे मागच्या काही दिवसांपासून भलताच चर्चेत आहे. हृतिक आणि गायिका, अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय. त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातंय. एकदा हृतिक आणि सबा एकमेकांचा हात धरून रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. हृतिकने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक स्टोरी ठेवली आहे. त्यामुळे सिनेवर्तुळात पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागली आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये नसीरुद्दीन शाह (Nasiruddin Shah) यांचा मुलगा इमाद शाह (Imamad Shah) आणि सबा यांचा एकत्र फोटो आहे. इमाद आणि सबा रिलेशनशिपमध्ये होते असं बोललं जातं. आता हृतिकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये इमादाच फोटो असल्यावर चर्चा तर होणारच ना!
हृतिक रोशनची इन्स्टाग्राम स्टोरी
हृतिकने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक स्टोरी ठेवली आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह आणि सबा यांचा एकत्र फोटो आहे.सबा आणि इमाद यांचा पुण्यात एक कार्यक्रम होणार आहे. याबाबत सबाने तिच्या इन्स्टाग्रामला स्टोरी शेअर केली होती. यात तिने इमादसोबत एक फोटो शेअर केलाय. हीच स्टोरी हृतिकने रिशेअर केली आहे. इमाद आणि सबा रिलेशनशिपमध्ये होते असं बोललं जातं. आता हृतिकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये इमादाच फोटो असल्याने सिनेवर्तुळात पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागली आहे.
सबा आझाने मानले आभार
हृतिकच्या या स्टोरीला सबाने शेअर केलं आहे आणि हृतिकचे आभार मानले आहेत. “थँक्यू हृतिक” असं सबा म्हणाली आहे.
सबा कोण आहे?
सबा आझाद ही एक गायिका आणि अभिनेत्री आहे. यासोबतच ती एका बँडचाही एक भाग आहे. याआधी ती नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाहसोबत 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जातं. हृतिकची पूर्व पत्नी सुझैन खानलाही सबा आवडते, काही दिवसांआधी सुझैनने सबाचा एक फोटो इन्स्टाग्नामवर शेअर केला होता.
संबंधित बातम्या