Kartik Aaryan | लाईव्ह शोमध्ये गंभीर जखमी झाला कार्तिक आर्यन, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक
काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही. कार्तिक आर्यन याच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. कार्तिक आर्यन याला दुखापत झाल्याचे कळते आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा प्रचंड चर्चेत आहे. हेरा फेरी 3 मध्ये कार्तिक आर्यन हा महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सोशल रंगली होती. मात्र, आता हे स्पष्ट झाले आहे की, कार्तिक आर्यन हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) चित्रपटाचा भाग नसणार आहे. नुकताच अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला होकार दिलाय. ज्यावेळी मोठ्या बाॅलिवूड (Bollywood) स्टारचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते, त्यावेळी कार्तिक आर्यन याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसले. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन याच्या भूल भुलैया 2 ने धमाल केला.
काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा कार्तिक आर्यन याचा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर प्लाॅप गेला. शहजादा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर कार्तिक आर्यन याला मोठा झटका बसलाय. कारण गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन याचे चित्रपट जबरदस्त कामगिरी करताना दिसत होते.
नुकताच कार्तिक आर्यन याच्याबद्दल एक मोठी बातमी पुढे येतंय. एका लाईव्ह परफॉर्मेंसच्या वेळी कार्तिक आर्यन याला मोठी दुखापत झालीये. विशेष म्हणजे दुखापत होऊनही कार्तिक आर्यन हा जवळपास 25 ते 30 मिनिटे स्टेजवरच होता. दुखापत झाल्याचे कार्तिक आर्यन याने सर्वांपासून लपवून ठेवले. कार्तिक आर्यन हा भूल भुलैया 2 चा सिग्नेचर स्टेप करत होता.
सुरूवातीला तिथे उपस्थित लोकांना वाटले की, कार्तिक आर्यन हा मजाक करत आहे. मात्र, त्यानंतर स्पष्ट झाले की, खरोखरच कार्तिक आर्यन याच्या पायाला दुखापत झाली. आता कार्तिक आर्यन याच्या पायाला दुखापत झाली हे समजताच चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. चाहते कार्तिक आर्यन याला काळजी घेण्याचा मेसेज देत आहेत. कार्तिक आर्यन याला दुखापत झाल्याचे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
कार्तिक आर्यन हा शहजादा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. मात्र, कार्तिक आर्यन याचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. कार्तिक आर्यन याच्यासोबतच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट देखील फ्लाॅप गेला. अगोदर कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर अक्षय कुमार याचा सेल्फी चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, दोन्ही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकले नाहीत.