Kartik Aaryan | त्या गोष्टीवर अखेर ‘कार्तिक आर्यन’ने सोडले माैन, म्हणाला दुर्लक्ष करणे कठीण…
अक्षय कुमारने या चित्रपटात काम करण्यास नकार देत सर्वांनाच मोठा धक्का दिला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला लागोपाठ चित्रपटांच्या आॅफर मिळत आहेत. अत्यंत कमी वेळामध्ये कार्तिकने स्वत: ची एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. भूल भुलैया चित्रपटामुळे कार्तिकला एक ओळख मिळालीये. गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन हा हेरा फेरी 3 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारने या चित्रपटात काम करण्यास नकार देत सर्वांनाच मोठा धक्का दिला. आता हेरा फेरी 3 या चित्रपटात अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अक्षय कुमारने हेरा फेरी 3 ला नकार दिल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अक्षय कुमारच्या जागी कोण भूमिका करणार हा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनचे नाव पुढे आले.
या चित्रपटाची स्टोरी आवडली नसल्याने नकार दिला असे स्वत: अक्षय कुमारने सांगितले. मात्र, हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार दिसणार नसल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे, तर दुसरी कडे कार्तिकचे चाहते आनंदात आहेत.
हेरा फेरी 3 साठी कार्तिक आर्यनचे नाव पुढे आल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या नावाचे अनेक मीम्स तयार होताना दिसत आहेत. इतकेच नाही तर यावर आता कार्तिक आर्यन याने देखील भाष्य केले आहे.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कार्तिक आर्यनने त्याच्यावर तयार केल्या जाणाऱ्या मीम्सवर म्हटले आहे की, मी हे मीम्स जेंव्हा पाहतो, त्यावेळी मला खूप जास्त हसू येते…इतकेच नाही तर अनेकजण मला हे सर्व मीम्स पाठवत असतात.
पूर्वी माझ्याकडे मला दुर्लक्ष होण्याची भीती वाटत होती. कारण माझ्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात असे, परंतू आता वेळ आली आहे की मला असे वाटते की माझ्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. रिप्लेसमेंट स्टार म्हटले तरीही मला काही वाटत नाही. मला आता कोणत्याच गोष्टींची भीती वाटत नाही.