कोल्ड ड्रिंक पिणे नवाजुद्दीन सिद्दीकी याला पडले महागात?, अभिनेता अडकला मोठ्या वादात, जाणून घ्या प्रकरण
बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया हिने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. यांचा वाद थेट कोर्टामध्ये पोहचला. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर होत असलेले आरोप पाहून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर काही गंभीर आरोप (Serious charges) केले. फक्त आरोपच नाही तर यांचा वाद थेट कोर्टात पोहचलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या एक्स पत्नीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Video) शेअर करत म्हटले होते की, मला आणि माझ्या मुलांना नवाजुद्दीन सिद्दीकी याने मध्यरात्री घराबाहेर काढले आहे. माझ्याकडे आता फक्त 71 रूपये आहेत. मी माझ्या मुलांना इतक्या रात्री घेऊन नेमकी कुठे जाऊ हे कळत नाहीये. या व्हिडीओनंतर अनेकांनी नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर टिका देखील केली होती.
पर्सनल लाईफमुळे अडचणीत असणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणीमध्ये अजून मोठी वाढ झालीये. नवाजुद्दीन सिद्दीकी एका जाहिरातीमुळे अडचणीमध्ये सापडलाय. कोलकाता उच्च न्यायालयाचे वकील दिब्यायन बॅनर्जी यांनी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि कोकाकोला कंपनी इंडियन डिव्हिजनचे सीईओ यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीये.
दिब्यायन बॅनर्जी यांच्या मते, जाहिरातीमधून बंगाली लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता या प्रकरणात पोलिस पुढे काय कारवाई करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पर्सनल लाईफमध्ये सर्व अडचणी सुरू असतानाच ही तक्रार दाखल झाल्याने अभिनेता चर्चेत आहे. या प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या एक्स पत्नीने त्याच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसला होता. आलिया ही सतत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आरोप करत होती. मात्र, यावर सुरूवातीला काहीही बोलणे हे नवाजुद्दीन सिद्दीकी याने टाळले होते. मात्र, शेवटी यावर मोठा खुलासा करत नवाजुद्दीन सिद्दीकी याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर अनेक बाॅलिवूड स्टारने नवाजुद्दीन सिद्दीकी याचा सपोर्ट केला होता.
इतकेच नाही तर एक्स पत्नीच नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या दुबईतील घरात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर काही आरोप केले. मात्र, काही दिवसांनीच त्या महिला कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटले होते की, आलिया मॅडमचा दबाब असल्याने मी नवाजुद्दीन सिद्दीकी सरांवर खोटे आरोप केले होते. नवाजुद्दीन सिद्दीकी सर खूप जास्त चांगले आहेत.