Salman Khan Rickshaw Video | सलमानकडे रिक्षा चालवण्याचं लायसन्स आहे का? काँग्रेस नगरसेविकेकडून कारवाईची मागणी

सलमानचे तीनचाकी (रिक्षा) चालवण्याचे लायसन्स तपासून पाहा, नसल्यास तातडीने सलमान विरोधात एफआयआर दाखल करा. कायद्यासोबत कोणीही छेडछाड करु शकत नाही, असं ट्वीट मुंबई महापालिकेतील काँग्रेस नगरसेविका ट्युलिप ब्रायन मिरांडा यांनी केलं आहे

Salman Khan Rickshaw Video | सलमानकडे रिक्षा चालवण्याचं लायसन्स आहे का? काँग्रेस नगरसेविकेकडून कारवाईची मागणी
सलमान खान रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 9:16 AM

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) नुकताच सर्पदंशातून (Snake Bite) सहिसलामत बचावला. ऐन वाढदिवसाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे चाहत्यांच्या काळजात धस्स झालं होतं. मात्र भाईजानचं दर्शन झालं आणि फॅन्सचा जीव भांड्यात पडला. आपण अत्यंत कूल असल्याचं दाखवणारा सलमानचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. सलमान पनवेलच्या रस्त्यावर रिक्षा (Salman Khan Driving Auto Rickshaw) चालवत असल्याचं यामध्ये दिसत आहे. मात्र सलमानकडे रिक्षा चालवण्याचा परवाना आहे का, असा सवाल करत काँग्रेस नगरसेविकेने सलमानवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सलमान खानला चाहत्यांसोबत मिळून-मिसळून राहायला आवडतं. तो आपले अनेक व्हिडीओही शेअर करत असतो. सलमान रिक्षा चालवतानाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला. त्यानंतर काँग्रेस नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सलमान खानवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस नगरसेविकेचं म्हणणं काय?

सलमानचे तीनचाकी (रिक्षा) चालवण्याचे लायसन्स तपासून पाहा, नसल्यास तातडीने सलमान विरोधात एफआयआर दाखल करा. कायद्यासोबत कोणीही छेडछाड करु शकत नाही, असं ट्वीट मुंबई महापालिकेतील काँग्रेस नगरसेविका ट्युलिप ब्रायन मिरांडा यांनी केलं आहे. नवी मुंबई पोलीस, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री कार्यालय यांना टॅग करत मिरांडा यांनी ही मागणी केली आहे.

सलमानच्या व्हिडीओमध्ये काय?

सलमान खान पनवेलमध्ये (Panvel) ऑटोरिक्षा  चालवताना व्हिडीओत दिसत आहे. 56 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पनवेलमध्ये तळ ठोकून असलेला सलमान खान रस्त्यावर रिक्षा चालवताना दिसतो. सलमान रिक्षा चालवत असल्याचं समजताच काही चाहत्यांनी मोबाईलवर त्याचे व्हिडीओ शूट केले. निळ्या रंगाचा टी-शर्ट, पांढरी शॉर्ट्स घातलेल्या सलमान खानने कॅपही घातली होती.

सलमान खान रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ पाहा :

वाढदिवसाच्या तोंडावर सर्पदंश

सलमान खान गेल्या आठवड्यापासूनच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पनवेलला पोहोचला होता. सलमानला वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पनवेल फार्म हाऊसमध्ये साप चावला होता. सलमानला सापाने तीन वेळा दंश केला होता. यानंतर भाईजानला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं, सुदैवाने काही तासांच्या उपचारानंतर त्याला सोडूनही देण्यात आलं. त्यानंतर सलमानने आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.

संबंधित बातम्या :

Salman Khan चालवतोय ऑटोरिक्षा, पनवेलमधला व्हिडिओ Viral

Shweta Tiwari | श्वेता तिवारीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून माजी पतीनेही केली कमेंट! पाहा काय म्हणाला…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.