Salman Khan Snake Bite | सलमान खानच्या फार्म हाऊसवर डॉक्टरांची टीम दाखल, साप चावल्यानंतर दबंग अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी नवे अपडेट्स
सलमानच्या चाहत्यांनी तर त्याच्या सुदृढ प्रकृतीसाठी प्रार्थनादेखील केली. दरम्यान सलमानच्या तब्येतीविषयी नवी माहिती समोर येत आहे. त्याची प्रकृती स्थिर असून MGMच्या डॉक्टरांच्या टीमने सलमानचे हेल्थ चेकअप केले आहे. त्यासाठी डॉक्टरांची टीम सलमानच्या फार्म हाऊसवर
मुंबई : वाढदिवस तोंडावर आलेला असताना दबंग अभिनेता सलमान खानला साप चावला. 25 डिसेंबरच्या रात्री त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये ही घटना घडली. सर्पदंश झाल्यानंतर सलमान खानची प्रकृती कशी आहे असे विचारले जात आहे. सलमानच्या चाहत्यांनी तर त्याच्या सुदृढ प्रकृतीसाठी प्रार्थनादेखील केली. दरम्यान सलमानच्या तब्येतीविषयी नवी माहिती समोर येत आहे. त्याची प्रकृती स्थिर असून MGMच्या डॉक्टरांच्या टीमने सलमानचे हेल्थ चेकअप केले आहे. त्यासाठी डॉक्टरांची टीम सलमानच्या फार्म हाऊसवर दाखल झाली होती.
सलमानच्या फार्महाऊसवर डॉक्टरांची टीम दाखल
सलमान खानला सर्पदंश झाल्यानंतर त्याला उपचारासाठी नवी मुंबईच्या कामोठेतल्या M.G.M रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे सलमानवर सुमारे 6 ते 7 तास उपचार करण्यात आला. प्रकृतीत सुधारणा दिसल्यानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. मात्र सलमान खानची तपासणी करण्यासाठी एमजीएमच्या डॉक्टरांची टीम पुन्हा एकदा सलमानच्या फार्महाऊसवर दाखल झाली. या टीमने सेकंड ओपीनियनसाठी सलमान खानची तपासणी केली आहे. सध्यातरी त्याची प्रकृती स्थिर आहे.
नेमकं काय घडलं होतं ?
25 डिसेंबरच्या रात्री सलमान खानसाठी त्याच्या अर्पिता या फार्महाऊसवर होता. मात्र त्याला सापाने अचानकपणे दंश केला. आपल्याला साप चावल्याचे समजताच सलमानने मदतीसाठी आरडाओरड केली. तसेच जवळच्या लोकांना फोनदेखील केला. त्यानंतर उशीर होण्यापूर्वी सलमानला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर नवी मुंबईच्या कामोठेतल्या M.G.Mमध्ये उपचार करण्यात आले. तसेच 26 डिसेंबरच्या सकाळी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
बर्थडे सेलिब्रेशनसाठी आला होता फार्म हाऊसवर
दरम्यान, सलमान खानचा 27 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन सलमानला आपला वाढदिवस जवळचे मित्र तसेच आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करायचा होता. यावेळी फार्म हाऊसवर आपल्या मित्रांसोबत गप्पा करताना सलमानला सापाने दंश केला होता.
इतर बातम्या :