सलमान खान याने भारताबद्दल केले धक्कादायक विधान, म्हणाला भारतापेक्षा दुबई…
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. मुंबई पोलिसांनी सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केलीये. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एक ईमेल करून सलमान खान याला थेट जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली. सलमान खान याला धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सलमान खान याला Y+ सुरक्षा दिलीये. फक्त मुंबई पोलिसच नाही तर सलमान खान याला त्याची खासगी सुरक्षा (Private security) देखील आहे. काही दिवसांपूर्वी राखी सावंत हिला ईमेल करून सलमान खान आणि आमच्या प्रकरणात पडून नकोस, तुझ्याशी आम्हाला काही देणे घेणे नाहीये. आम्ही सलमान खान याला सुरक्षेमध्येच मारणार असल्याचा मेल राखी हिला पाठवण्यात आला.
सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्येही भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई हा सतत धमक्या देत आहे. काही दिवसांपूर्वी जेलमधून दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला आपण जीवे मारणार असल्याचे थेट म्हटले होते.
नुकताच सलमान खान याने एक मुलाखत दिलीये. यावर सलमान खान याने भाष्य देखील केले. दुबईमधील एका कार्यक्रमात बोलताना सलमान खान याने मोठे भाष्य केले होते. सलमान खान याने म्हटले की, सायकलवर एकट्याला फिरणे देखील अवघड झाले आहे. मला कितीही धमक्या मिळाल्या तरीही यूएईमध्ये सुरक्षित वाटते. पण भारतामध्ये थोडी समस्या आहे.
मुलाखतीमध्ये सलमान खान याने म्हटले की, सर्व गोष्टींबाबत आपण खूप काळजी घेत आहोत. दुबईत झालेल्या एका जुन्या मुलाखतीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमान खान याने असुरक्षिततेपेक्षा सुरक्षा चांगली असल्याचे देखील म्हटले आहे. लॉरेन्स बिश्नोई हा जेलमध्ये राहून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देताना दिसतोय.
सलमान खान याने गेल्या वर्षी मोठा निर्णय घेत स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना देखील घेतला आहे. सलमान खान याने काळवीटची शिकार केल्यापासून लॉरेन्स बिश्नोई सतत त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देताना दिसत आहे. अनेकदा यावर लॉरेन्स बिश्नोई हा थेट बोलला देखील आहे. बिश्नोई समाजाची माफी मागण्यास सतत लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खान याला सांगताना दिसतोय. यावर उघडपणे भाष्य करताना सलमान खान हा दिसला आहे.