Salman Khan | सलमान खान याने घेतली ममता बनर्जीची भेट, या विषयावर झाली चर्चा? व्हिडीओ व्हायरल होताच
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झालाय. विशेष म्हणजे सलमान खान हा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला. सलमान खान याच्या चित्रपटातून पलक तिवारी हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा नुकताच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे सलमान खान याच्या चित्रपटाने चांगली कमाई ही बाॅक्स आॅफिसवर केलीये. सलमान खान याच्या चित्रपटातून बिग बाॅस (Bigg Boss) फेम शहनाज गिल आणि श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी यांनी बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सलमान खान याच्या या चित्रपटाबद्दल (Movie) चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता.
नुकताच सलमान खान याने थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांची भेट घेतलीये. सलमान खान हा सुरूवातीला ममता बनर्जी यांच्या कार्यालयाबाहेर पोहचला. ममता बनर्जी देखील सलमान खान याचे स्वागत करण्यासाठी पोहल्या. कार्यालयाच्या बाहेर येत ममता बनर्जी यांनी शाल देऊन सलमान खान याचे स्वागत केले.
यावेळी पापाराझीला पोझ देताना सलमान खान आणि ममता बनर्जी दिसले. त्यानंतर सलमान खान हा ममता बनर्जी यांच्या कार्यालयात गेला. सलमान खान हा ममता बनर्जी यांना भेटण्यासाठी गेल्याने आता विविध चर्चा या रंगू लागल्या आहेत. आता सलमान खान आणि ममता बनर्जी यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
#WATCH | Actor Salman Khan meets West Bengal CM Mamata Banerjee at the latter’s residence in Kolkata pic.twitter.com/ilydxg9Edi
— ANI (@ANI) May 13, 2023
सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांचा 13 मेला म्हणजेच आज कोलकातामध्ये एक कॉन्सर्ट परफॉर्म आहे. यासाठी सलमान खान हा कोलकातामध्ये आहे. एएनआई ममता बनर्जी आणि सलमान खान याच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. मुळात म्हणजे जानेवारीमध्येच सलमान खान याचा परफॉर्म होता. मात्र, सतत त्याची तारीख पुढे ढकलली जात होती.
लॉरेंस बिश्नोई हा सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याने सतत कॉन्सर्टच्या तारीखमध्ये बदल होत होते. सलमान खान याला थेट जेलमधून लॉरेंस बिश्नोई याने जीवे मारण्याची धमकी दिली. एका मुलाखतीमध्ये लॉरेंस बिश्नोई याने जाहिरपणे ही धमकी दिली. लॉरेंस बिश्नोई याच्या धमकीनंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये.