पत्नी प्रेग्नेंट असताना अभिनेते संजय खान यांनी दिला होता धोका, या अभिनेत्रीसोबत अफेअर

| Updated on: Jan 03, 2023 | 11:03 PM

हे अभिनेते सरळ सरळ आपल्या पत्नींना धोका देतात. यापैकी एक म्हणजे प्रसिध्द अभिनेते संजय खान हे देखील होते.

पत्नी प्रेग्नेंट असताना अभिनेते संजय खान यांनी दिला होता धोका, या अभिनेत्रीसोबत अफेअर
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड इंडस्ट्रीमधील असे अनेक राज आहेत, जे अजूनही प्रेक्षकांपर्यंत पोहचलेले नाहीयेत. बाॅलिवूडमध्ये जशी गोष्ट प्रेक्षकांना दाखवली जाते, तशी अजिबात नसते. अनेक राज बाॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये लपलेले आहेत. अभिनेत्याचे आणि एखाद्या अभिनेत्रीचे रिलेशन असणे काॅमन गोष्ट झालीये. मात्र, बाॅलिवूडमध्ये असेही काही अभिनेते आहेत की, लग्न झालेले असताना देखील त्यांचे इतर अभिनेत्रींसोबत अफेअर होते. हे अभिनेते सरळ सरळ आपल्या पत्नींना धोका देतात. यापैकी एक म्हणजे प्रसिध्द अभिनेते संजय खान हे देखील होते.

संजय खान यांनी पत्नी जरीन खान हिला धोका दिलेला आहे. विशेष बाब म्हणजे सिमी ग्रेवालच्या शोमध्ये त्यांनी पत्नीसमोर हे मान्य केले की, त्यांनी आपल्या पत्नीला धोका दिला होता. विशेष म्हणजे हे जरीन खान यांना देखील माहिती होते.

जरीन खान खूप फेमस माॅडेल राहिल्या आहेत. इतकेच नाहीतर त्यांनी काही चित्रपटांमध्ये भूमिका देखील केल्या आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी जरीन खान संजय खान याच्या प्रेमामध्ये पडली होती. प्रेमासाठी त्यांनी चक्क चांगले करिअर देखील सोडले होते.

जरीन खान प्रेग्नेंट असताना संजय खान त्यांना धोका देत होते. त्यावेळी त्यांचे अफेअर हे जीनत अमान हिच्यासोबत सुरू होते. अशी एक चर्चा देखील होती की, त्यांनी जीनत अमानसोबत लग्न देखील केले. मात्र, काही गोष्टी संजय खान आणि जीनत अमान यांच्यामध्ये बिनसल्याने ते वेगळे झाले.

अब्दुल्ला चित्रपटाच्या शूटिंगवेळी संजय खान आणि जीनत अमान यांचे अफेअर सुरू झाले होते. त्यावेळी जरीन खान प्रेग्नेंट होत्या. विशेष म्हणजे आपले अफेअर सुरू होते हे पत्नीसमोर संजय खान यांनी मान्य देखील केले होते.