‘मी असो वा नसो, सर्वाना मोफत उपचार मिळायला हवेत’, सोनू सूद हैद्राबादमध्ये सुरु करणार रुग्णालय!

गेल्या आठवड्यात आयकर विभागाने सोनू सूदच्या (Sonu Sood) सहा ठिकाणी छापे टाकले होते, त्यानंतर त्याच्या फाउंडेशनकडे आलेल्या निधीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सोनू सूदवर कर चुकवल्याचा आरोपही करण्यात आला आहे, ज्याला अभिनेत्याने नकार दिला.

‘मी असो वा नसो, सर्वाना मोफत उपचार मिळायला हवेत’, सोनू सूद हैद्राबादमध्ये सुरु करणार रुग्णालय!
Sonu Sood
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 1:30 PM

मुंबई : गेल्या आठवड्यात आयकर विभागाने सोनू सूदच्या (Sonu Sood) सहा ठिकाणी छापे टाकले होते, त्यानंतर त्याच्या फाउंडेशनकडे आलेल्या निधीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सोनू सूदवर कर चुकवल्याचा आरोपही करण्यात आला आहे, ज्याला अभिनेत्याने नकार दिला. अलीकडेच, बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदने आयकर विभागाची कार्यवाही आणि हैदराबादमध्ये हॉस्पिटल उघडण्याच्या योजनेबद्दल सांगितले आहे.

सुमारे 18 कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीच्या आरोपावर, सोनू सूद म्हणाले की, कोणत्याही फाउंडेशनला मिळालेल्या निधीचा वापर करण्यासाठी एक वर्षाची मुदत असते. जर त्या एका वर्षात निधी वापरला गेला नाही, तर तुम्ही पुढच्या वर्षी त्याचा वापर करू शकता. हे नियम आहेत. मी काही महिन्यांपूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर या फाउंडेशनची यादी केली होती. अन्यथा, पहिल्या लाटेदरम्यान, जेव्हा मी स्थलांतरितांना मदत करण्यास सुरुवात केली, तेव्हा माझ्याकडे असे लोक होते ज्यांनी स्थलांतरितांसाठी बस बुक करण्याची ऑफर दिली. आम्ही तेव्हा पैसे गोळा करत नव्हतो.

सोनू सूद हैदराबादमध्ये हॉस्पिटल उघडणार!

अभिनेता पुढे म्हणाला की, मी फक्त गेल्या चार-पाच महिन्यांत निधी गोळा करण्यास सुरुवात केली. नियमानुसार, हा निधी वापरण्यासाठी माझ्याकडे सात महिन्यांपेक्षा जास्त वेळ अजून शिल्लक आहे. मी लोकांचा आणि माझ्या कष्टाचा पैसा वाया घालवत नाही. मी ब्रँडच्या अनुमोदनातून जे कमावतो, त्यापैकी 25 टक्के आणि कधीकधी 100 टक्के थेट माझ्या फाउंडेशनमध्ये जाते. जर, ब्रँडने पैसे दान केले तर मी त्यांची जाहिरात विनामूल्य करतो. फाउंडेशनमधील निधी देखील माझा वैयक्तिक निधी आहे, जो मी दान केला आहे.

मी असो वा नसो…

यानंतर, सोनू सूदने पुन्हा हैदराबादमध्ये हॉस्पिटल उघडण्याच्या त्याच्या योजनेबद्दल सांगितले. सोनू म्हणाला की, आमच्याकडे मदतीसाठी असलेल्या सर्व लोकांसाठी, त्यातील अनेकांवर हैदराबादमध्ये उपचार करण्यात आले आहेत. हैदराबादमधील काही रुग्णालयांची पायाभूत सुविधा वेगळ्या पातळीवर आहे. आमची येत्या 50 वर्षांची योजना अशी आहे की, जरी सोनू सूद जिवंत असेल किंवा नसेल, तरी लोकांना या धर्मादाय रुग्णालयाद्वारे मोफत उपचार मिळालेच पाहिजेत.

तो म्हणाले की, माझी स्वप्ने मोठी आहेत आणि मी सध्या एका मोठ्या मिशनवर आहे. गेल्या काही दिवसात मी हॉस्पिटल प्रकल्पावर आधीच 2 कोटी रुपये खर्च केले आहेत. हे अत्याधुनिक, मोफत, गरजूंसाठी उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देणारे सुसज्ज रुग्णालय असेल. आम्ही आधीच अनाथाश्रम आणि शाळेच्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहोत. सर्व प्रकल्प त्यांच्या कामावर आहेत.

हेही वाचा :

‘माझं अजूनही तुझ्यावर प्रेम…’, प्रिया बापट-उमेश कामतच्या क्यूट व्हिडीओवर चाहतेही फिदा!

Painjan Tuz : ‘डान्सिंग गर्ल’ सलोनी सातपुते आणि ‘डीआयडी’ फेम दीपक हुलसुरे ‘पैंजण तुझं’ या कोळीगीतातून प्रेक्षकांच्या भेटीला

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.