Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

२२ वर्षापूर्वी सनी देओलने गदर सिनेमात हँडपंप उखडला, आता गदर २ मध्ये संतापात हातात ही वस्तू आलीय…

या चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.

२२ वर्षापूर्वी सनी देओलने गदर सिनेमात हँडपंप उखडला, आता गदर २ मध्ये संतापात हातात ही वस्तू आलीय...
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 10:53 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा ‘गदर 2’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटातील सनीचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. विशेष म्हणजे चाहत्यांना सनीचा लूक जबरदस्त आवडलेला दिसतोय. तब्बल 22 वर्षांनंतरही गदर 1 एक प्रेम कथा प्रमाणेच सनी देओलमध्ये तोच जोश दिसतोय. 2023 मध्ये गदर 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी 2001 मध्ये गदर 1 हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. बाॅक्स आॅफिसवर या चित्रपटाने अक्षरशा धमाल केली होती.

सनी देओल याला गदर या चित्रपटामुळेच खरी ओळख मिळालीये. गदर चित्रपटाचे शो पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असायचे. या चित्रपटात सनी देओलसोबत अमीषा पटेल देखील मुख्य भूमिकेत होती. गदर 2 मध्येही सनीसोबत अमीषा पटेल असणार आहे.

गदर 2 च्या 50 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये सनी देओल हा बैलगाडीचे चाक हातामध्ये उचलताना दिसतोय. गदर 1 प्रमाणेच फुल जोशमध्ये सनी देओल दिसतोय. पूर्वीप्रमाणेच सनी देओलचा लूक दिसत आहे.

Gadar 2

गदर 1 मध्ये सनी देओल याने हँडपंप उखडला होता. आता तो बैलगाडीचे चाक हातामध्ये घेऊन आपल्या दुश्मनांचा समाचार घेताना दिसतोय. विशेष म्हणजे चाहत्यांना सनी देओलचा हा खास लूक आवडलाय.

अनेकांनी सोशल मीडियावर या फर्स्ट लूकवर कमेंट करत म्हटले आहे की, हा चित्रपट नक्कीच बाॅक्स आॅफिसवर हीट ठरेल. या चित्रपटाची शूटिंग आता पुर्ण होत आलीये. हा चित्रपट 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गदर 2 चा हा फर्स्ट लूक टीझरचा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झालीये. गदर 1 मध्ये सनी देओल हा तारा सिंह याच्या भूमिकेत तर अमीषा पटेल सकीनाच्या भूमिकेत होते.

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.