Tiger Shroff | टायगर श्रॉफ याचा नवा लूक पाहून चाहत्यांना बसला मोठा धक्का, अभिनेत्याने काहीही न खाता पिता…

| Updated on: Feb 14, 2023 | 9:59 PM

मुळात म्हणजे टायगर श्रॉफ हा आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो. आज काल प्रत्येक अभिनेत्याला आपल्या बाॅडीकडे (Body) लक्ष द्यावे लागत आहे. स्क्रीनवर चांगले दिसण्यासाठी सर्वांनाच जिममध्ये घाम गाळावा लागतोय.

Tiger Shroff | टायगर श्रॉफ याचा नवा लूक पाहून चाहत्यांना बसला मोठा धक्का, अभिनेत्याने काहीही न खाता पिता...
Follow us on

मुंबई : ‘बडे मियाँ छोटे मियाँ 2’ या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा चर्चेत आहे. बडे मियाँ छोटे मियाँ 2 या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ हा अक्षय कुमार याच्यासोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटासाठी टायगर आपली बॉडी फ्लॉंट करताना दिसतोय. मुळात म्हणजे टायगर श्रॉफ हा आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो. आज काल प्रत्येक अभिनेत्याला आपल्या बाॅडीकडे (Body) लक्ष द्यावे लागत आहे. स्क्रीनवर चांगले दिसण्यासाठी सर्वांनाच जिममध्ये घाम गाळावा लागतोय. टायगर श्रॉफ याच्या बॉडीवर अनेकजण फिदा आहेत. तो आपल्या बाॅडीवर खूप मेहनत घेतो. आपल्या बॉडी फ्लॉंटमुळे टायगर श्रॉफ हा कायमच चर्चेत राहतो. बाॅलिवूडमधील प्रत्येक अभिनेता हा आपल्या चित्रपटातील पात्रानुसार आपल्या बॉडीवर काम करतात. अनुपम खेर यांनीही त्यांच्या आगामी चित्रपटासाठी या वयामध्ये बॉडी फ्लॉंट (Body Flaunt) केला आहे. अनुपम खेर यांचे फोटो पाहून अक्षय कुमार याने त्यांना थांबण्याचा सल्ला देखील दिला होता.

टायगर श्रॉफ हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसाठी खास फोटोही शेअर करतो. सध्या सोशल मीडियावर टायगर श्रॉफ याचे नवे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

टायगर श्रॉफ याचा नवा एक फोटो पाहून चाहत्यांनी त्याचे काैतुक केले आहे. टायगर श्रॉफ याने त्याचा नवा फोटो हा इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये टायगर श्रॉफ याची बाॅडी पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

शेअर केलेल्या या फोटोमध्ये टायगर श्रॉफ याचे टोन्ड लेग्स आणि मसल्स दिसत आहेत. या पोस्टमध्ये टायगरने लिहिले की, विश्रांती न घेता आणि काहीही न खाता ही बॉडी तयार केली…

आता टायगर श्रॉफ याच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात अनेकांनी कमेंट करण्यास सुरूवात केलीये. विशेष म्हणजे बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी यासाठी टायगर श्रॉफचे काैतुकही केले आहे.

टायगर श्रॉफ याच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांचे कायमच प्रेम मिळते. टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो. अनेकदा चाहत्यांसाठी टायगर श्रॉफ हा जिममधील फोटो आणि व्हिडीओही शेअर करतो.