Anupam Kher | अनुपम खेर यांनी घेतला प्रकाश राज यांचा समाचार, थेट काढली औकात, म्हणाले…

द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटामध्ये बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी महत्वाची भूमिका केली. सर्वांनीच अनुपम खेर यांचे काैतुकही केले.

Anupam Kher | अनुपम खेर यांनी घेतला प्रकाश राज यांचा समाचार, थेट काढली औकात, म्हणाले...
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 2:25 PM

मुंबई : द काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून विवेक अग्निहोत्री (Anupam Kher) हे प्रचंड चर्चेत आहेत. साऊथ चित्रपटाचे स्टार प्रकाश राज कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी प्रकाश राज यांनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. प्रकाश राज यांनी थेट द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला बकवास म्हटले. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रकाश राज यांचा चांगलाच क्लास लावत त्यांना खडेबोल सुनावले. प्रकाश राज यांनी केरळमधील मातृभूमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ लेटर्समध्ये थेट द कश्मीर फाईल्स चित्रपटाला बकवास म्हटले होते. त्यानंतर अनेकांनी प्रकाश राज यांचा चांगलाच समाचार घेतला. द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटामध्ये बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी महत्वाची भूमिका केली. सर्वांनीच अनुपम खेर यांचे काैतुकही केले. मुळात म्हणजे द कश्मीर फाईल्स हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दोन गट विभागले गेले होते. आता चित्रपटाला रिलीज होऊन इतके दिवस झालेले असताना देखील अनेकजण या चित्रपटावर टिका करत आहेत.

प्रकाश राज यांनी द कश्मीर फाईल्स या चित्रपटाला बकवास म्हटल्यानंतर आता अनुपम खेर यांनीही प्रकाश राज यांना खडेबोल सुनावले आहेत. अनुपम खेर म्हणाले की, लोक स्वतःच्या औकातबद्दल बोलतात. काही लोकांना आयुष्यभर खोटे बोलावे लागते. काही लोक आयुष्यभर सत्य बोलतात. मी अशा लोकांपैकी एक आहे ज्यांनी आयुष्यभर खरे बोलले, ज्यांना खोटे बोलून जगायचे आहे, ती त्यांची स्वतःची निवड आहे.

अनुपम खेर यांनी या कमेंटमध्ये कुठेही प्रकाश राज यांच्या नावाचा उल्लेख अजिबात केला नाहीये. मात्र, अनुपम खेर यांनी हा टोमणा नेमका कोणाला लावला आहे हे सर्वांनाच कळाले. प्रकाश राज यांना द काश्मीर फाईल्स चित्रपट फारसा आवडला नाही, त्यामुळे त्यांनी या चित्रपटाला टार्गेट केले.

मुळात म्हणजे बाॅक्स आॅफिसवर द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची हवा बघायला मिळाली होती. अत्यंत कमी बजेटमध्ये द काश्मीर फाईल्स हा चित्रपट तयार झालाय. मात्र, सर्वांना मोठा धक्का देत अधिक कमाई द काश्मीर फाईल्स या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर नक्कीच केलीये.

विवेक अग्निहोत्री यांनी प्रकाश राज यांच्या त्या विधानाचा चांगलाच समाचार घेत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. भास्करला मिस्टर अंधाकार राजमध्ये कसे मिळवू शकतो, हे सर्व तुझेच आहे, असे विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.