Disha Patani | दिशा पाटनी ट्रोल, नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल, थेट म्हणाले, छोटी मुलगी…
दिशा पाटनी ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. दिशा पाटनी ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. सध्या दिशा पाटनी ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीये. ज्यामुळे ती चर्चेत आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. विशेष म्हणजे दिशा पाटनी (Disha Patani) ही आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. दिशा पाटनी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याला दिशा पाटनी ही डेट करत असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सतत रंगताना दिसत होत्या. मात्र, यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याचे कळत आहे. इतकेच नाहीतर हे दोघे कायमच स्पाॅट देखील व्हायचे. विशेष म्हणजे दिशा पाटनी ही बऱ्याच वेळा टायगर श्रॉफ याच्या कुटुंबियांसोबतही फिरताना दिसलीये.
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. मात्र, या व्हिडीओनंतर दिशा पाटनी ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. अनेकांनी दिशा पाटनी हिला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केलीये. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे दिशा पाटनी हिला जोरदार ट्रोल केले जात आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिशा पाटनी हिला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल केले जात आहे. दिशा पाटनी हिने जो ड्रेस घातलाय तो लोकांना अजिबातच आवडलेला दिसत नाहीये. हा ड्रेस खूपच जास्त लहान असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. एकाने तर थेट म्हटले की, दिवसेंदिवस दिशा पाटनी हिचे कपडे लहान होत जात आहेत.
एका युजर्सने दिशा पाटनी हिच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, दिशा तू स्वत: ला एखादी लहान मुलगी समजते का? दुसऱ्याने लिहिले की, बघावे तेंव्हा हिचे कपडे लहान लहान होताना दिसत आहेत. तिसऱ्याने तर दिशा पाटनी हिची तुलना थेट उर्फी जावेद हिच्यासोबतच केलीये. कमेंट करत युजर्सने लिहिले की, ही तर उर्फी जावेद हिची बहीणच आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी मौनी रॉय आणि दिशा पाटनी यांचे खास लूकमधील फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसले. दिशा आणि मौनीच्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला होता. मौनी रॉय आणि दिशा पाटनी या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. मौनी रॉय हिने ते फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
मौनी रॉय हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिशा पाटनीही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत होती. या दोघी अभिनेत्रींच्या लूकवर चाहते फिदा झाले होते. मात्र, यादरम्यान अनेकांनी यांना ट्रोल करण्यासही सुरूवात केली होती. मौनी रॉय आणि दिशा पाटनी या सोबत सुट्टया घालवताना दिसल्या होत्या.