मुंबई : बच्चन परिवारावर पुन्हा कोरोनाचं संकट आलेलं आहे. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या पत्नी अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bacchan) यांना कोरोनाची लागण (Jaya Bacchan Corona positive) झाली आहे. बॉलिवूड हंगामाने (Bollywood hangama) जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त दिलं आहे. मागील वर्षी महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. बच्चन यांच्या घरात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आता जया बच्चन कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. दुसरीकडे अभिनेत्री जया बच्चन दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) रॉकी और राणी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani ki Prem Kahani) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मात्र आधी शबाना आझमी आणि आता जया बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चित्रपटाचं शूटिंग थांबविण्यात आलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजेच 2020 मध्ये, जेव्हा अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या कोरोना पॉझिटिव्ह आले, तेव्हा जया बच्चन कोरोनापासून वाचल्या होत्या, पण तिसऱ्या लाटेत आता त्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
करण जोहरने चित्रपटाचं शूटिंग थांबवलं
करण जोहरच्या रॉकी और राणी की प्रेम कहानी या महत्त्वाच्या चित्रपटात शबाना आझमी आणि जया बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 1 फेब्रुवारीला शबाना आझमी यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता जया बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आधी शबाना आझमी, आता जया बच्चन कोरोनाच्या विळख्यात!
जया बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर करण जोहरने चित्रपटाचं शूटिंग थांबवलं आहे. करण जोहरचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चं शेड्यूल पुढे ढकललं आहे. बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, प्रथम शबाना आझमी आणि नंतर जया बच्चन आणि दोघांचेही अहवाल काही दिवसांच्या अंतराने पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळेच करणने शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडिया वृत्तानुसार, चित्रपटातील स्टारकास्ट आणि इतरही तंत्रज्ज्ञ अधिक धोका पत्करण्यास तयार नाहीयत. त्यामुळे करणला चित्रपटाचं शूटिंग पुढे ढकलण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. त्याचमुळे करणने तडकाफडकी शूटिंग पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या