Kriti Sanon | बाहुबलीमधील या अभिनेत्याला क्रिती सनॉन करत आहे डेट, जाणून घ्या सविस्तर…
क्रिती आणि प्रभास आदिपुरुष चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. रिपोर्टनुसार, आदिपुरुषच्या सेटवर पहिल्या दिवसापासून क्रिती सनॉन आणि प्रभासमध्ये खूप चांगले बॉन्डिंग होते. कॉफी विद करण 7 मध्ये क्रिती सनॉन आली होती, त्यावेळी तिने प्रभासला फोन केला होता.
मुंबई : अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते. अत्यंत कमी वेळेमध्ये क्रितीने इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रिती सनॉन सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या बोल्ड फोटोंमुळे क्रिती इंटरनेटचा (Internet) पारा नेहमी वाढवते. गेल्या काही वर्षांमध्ये क्रिती सनॉनच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही फॅन फाॅलोइंगमध्ये देखील क्रितीच्या वाढ झाली आहे. आता क्रिती सनॉन एका वेगळ्याच विषयावरून चर्चेत आलीये. क्रिती सनॉन आणि सुपरस्टार प्रभास (Prabhas) रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. मात्र, यावर अध्याप क्रिती किंवा प्रभास यांनी कोणतेही भाष्य केले नाहीये.
क्रितीचे या अभिनेत्यांसोबत अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण…
क्रिती आणि प्रभास आदिपुरुष चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. रिपोर्टनुसार, आदिपुरुषच्या सेटवर पहिल्या दिवसापासून क्रिती सनॉन आणि प्रभासमध्ये खूप चांगले बॉन्डिंग होते. कॉफी विद करण 7 मध्ये क्रिती सनॉन आली होती, त्यावेळी तिने प्रभासला फोन केला होता, त्यावेळेपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. क्रिती आणि प्रभासचे सूत आदिपुरुष चित्रपटाच्या सेटवर जुळल्याचे सांगितले जात आहे. कारण मुळात प्रभास अत्यंत लाजाळू आहे, मात्र, तो क्रितीसोबत खूप जास्त गप्पा मारताना अनेकदा सेटवर दिसला.
या चित्रपटाच्या सेटवर झाली अभिनेत्यासोबत भेट…
क्रिती सनॉन आणि प्रभास यांनी आपल्या नात्याबद्दल अध्याप कोणतेही भाष्य केले नाहीये. अशी एक चर्चा आहे की, दोघेपण आपल्या नात्याला थोडा वेळ देऊ इच्छीत आहेत. मात्र, जेंव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, त्यावेळीपासून चाहते क्रिती आणि प्रभासलासोबत पाहण्यास इच्छुक आहेत. या दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते आहे. क्रिती आणि प्रभास नेहमी एकमेकांना कॉल आणि मेसेज करत असल्याच्या देखील बातम्या येत आहेत.