आयेशा सय्यद, मुंबई : एक अभिनेत्री जी तिच्या केवळ अबोल राहून बोलायची. शब्दांविना केवळ आपल्या हावभावातून मनातल्या सगळ्या भावभावनांना पडद्यावर आकार द्यायची. जिच्या नावापुढे फक्त सुपरहिट हाच शब्द चपखल बसतो. ती अभिनेत्री म्हणजे मधुबाला (madhubala). चंदेरी जगाला पडलेलं एक सोनेरी स्वप्न… मधुबालाच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी शब्द कितीही आखीव रेखीव असले तरी ते अपुरे पडतील. पण आज मधुबाला यांचा स्मृतीदिन. त्यामुळे त्यांच्या सुपरहिट कारकीर्दीचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न…
दिल्लीत बालपण
अताउल्लाह खान आणि आयेशा बेगम यांच्या घरात 14 फेब्रुवारी 1933 ला एक हिरा जन्माला आला ज्याचं नाव मधुबाला. लहानपणापासूनच मधुबाला यांना चित्रपट बघण्याचा छंद होता. तेव्हापासूनच त्या चंदेरी दुनियेचा भाग होऊ इच्छित होत्या. पण त्यांच्या वडिलांचा त्याला विरोध होता. पण हळूहळू त्यांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी मधुबाला यांना पुढे जाण्यासाठी पाठिंबा दिला. आणि वयाच्या केवळ सातव्या वर्षी त्यांनी ऑल इंडिया रेडिओ स्टेशनवर त्यांनी काम केलं.
बॉलिवूडमध्ये एन्ट्री
मधुबाला यांनी बसंत या चित्रपटात 1942 साली काम केलं. हा त्यांचा पहिला सिनेमा. त्यांच्या पहिल्या सिनेमातील कामाने अनेकांना प्रभावित केलं. तिथून पुढे मधुबाला यांना कामाच्या ऑफर्स येऊ लागल्या. पुढे त्यांनी राज कपूर यांच्यासोबत काम केलं. अशोक कुमार, दिलीप कुमार, देव आनंद या सुपरहिट कलाकारांसोबत त्यांनी मोठा पडदा गाजवला.
सुपरहिट सिनेमे
मधुबाला म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो ‘मुघल-ए- आझम’ हा सुपर-डुपर हिट सिनेमा. यातली अनारकली आजही मनातच्या कोपऱ्यात अलगद घर करते. याशिवाय मुमताज महल, दिल की राणी, नीलकमल, अमर प्रेम, दौलत, दुलारी, हँसते आसू, बेकसूर, बादल, खजाना, अरमान, काला पानी, हावडा ब्रिज, बरसात की रात, महलों के ख्वाब, हाफ टिकट, शराबी, ज्वाला यासारख्या 73 सिनेमात त्यांनी काम केलं. ज्यातले अनेक सुपरहिट झाले.
सुपरहिट गाणी
एक लडकी भिगी भागी सी, आइये मेहरबान,प्यार किया तो डरना क्या, हाल कैसा है जनाब का, अच्छा जी मै हारीं या सारखा सुपरहिट गाण्यांचा मधुबाला चेहरा होत्या. मधुबाला यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांनी गाण्यांना अधिक अर्थपूर्ण बनवलं.
संबंधित बातम्या