नेटकरी म्हणाले ‘तू तर उतावळी नवरी आणि गुडघ्याला बाशिंग’, मलायकाचं असं उत्तर, ट्रोलर दोनदा विचार करतील!

मलायका नेहमी ट्रोल होत असते. अनुल्लेखाने ट्रोलर्सना मारण्याचा ती प्रयत्न करते. पण पहिल्यांदाच ट्रोलरला मलायकाने उत्तर दिलं आहे.

नेटकरी म्हणाले 'तू तर उतावळी नवरी आणि गुडघ्याला बाशिंग', मलायकाचं असं उत्तर, ट्रोलर दोनदा विचार करतील!
मलायका अरोराImage Credit source: मलायका अरोरा इन्स्टाग्राम
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 4:45 PM

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) बोल्ड आणि बिनधास्त… पण नेटकरी मात्र तिला ट्रोल करत असतात. पण ती याकडे दुर्लक्ष करून ती या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असते. पण आता पहिल्यांदाच तिने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. तिच्या उत्तराने ट्रोलर्स दोनदा विचार करूनच ट्रोलर्स तिला ट्रोल करण्याचं धाडस करती. तिची स्टाईल, तिचा घटस्फोट, तिचं अफेअर, तिचं ब्रेकअप मलायकाच्या सगळ्याच गोष्टी चर्चेत असतात. मलायका काय करते काय नाही यावर नेटकऱ्यांची बारिक नजर असते.बऱ्याचहा तिला ट्रोलही केलं जातं. अर्जुन कपूर आणि मलायका रिलेशनशीपमध्ये आहेत. या दोघांच्या वयातील अंतरामुळे त्यांच्यावर टीका होते. एका नेटकऱ्याने तिला ‘तू तर उतावळी नवरी आणि गुडघ्याला बाशिंग’ असं म्हटलं होतं. त्यावरच मलायका बोलती झाली आहे.

मलायकाचं ट्रोलर्सना उत्तर

मलायका नेहमी ट्रोल होत असते. अनुल्लेखाने ट्रोलर्सना मारण्याचा ती प्रयत्न करते. पण पहिल्यांदाच ट्रोलरला मलायकाने उत्तर दिलं आहे. मलायका म्हणाली की, “आपल्या समाजात मुलगा वयाने मोठा असेल आणि मुलगी लहान असेल तर चालतं. पण मुलगी वयाने मोठी असेल आणि मुलगा लहान असेल तर लोकांच्या डोळ्यात खुपतं. अश्या कमकुवत मनाच्या लोकांना मी गणतीत धरत नाही. अश्या लोकांकडे मी साफ दुर्लक्ष करते. त्यांच्या कमेंट्स मी वाचतही नाही. कारण त्यांचा विचार केला तर आपण जगू शकत नाही”, असं मलायका म्हणाली आहे. त्यामुळे मलायकाच्या ट्रोलर्सना तिच्या पोस्टवर कमेंट करताना दोनदा विचार जरूर करावा लागेल. कारण जर ती त्या कमेंट्स वाचत नसेल तर तुमचे कष्ट वाया जात आहेत.

मलायका ट्रोल

काही दिवसांआधी मलायका तिच्या कपड्यांवरून ट्रोल झाली होती. मलायकाने पांढऱ्या रंगाचा एक शर्ट घातलेला. त्यावर तिने पिवळ्या रंगाचा स्वेटरही घातला होता. पण हा शर्ट आणि स्वेटर मोठा असल्यामुळे तिने घातलेली शॉर्ट दिसत नाही. पण हाच धागा धरत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. “तु घाई घाईत पॅन्ट घालायला विसरली आहेस का?” असा थेट प्रश्न एकाने विचारला.

मलायका तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. त्यासाठी ती कधी योगा करताना दिसते तर कधी जीममध्ये वर्कआऊट करते. नेहमीप्रमाणे मयालका तिच्या पाळीव कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यावेळी तिने ग्रे कलरची ट्रॅक पॅण्ट आणि पांढऱ्या रंगाचं स्वेट-टी शर्ट घातलं होतं. कोरोनापासून बचावासाठी दोन मास्कही लावले होते. पण तिने ब्रा घातली नव्हती. तिचा असा हा ‘विदाऊट ब्रा’ लूकमधला फोटो एका फोटोग्राफरने काढला आणि तो फोटो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि झालं… मलायका सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.

संबंधित बातम्या

एक फोन आणि सोनू सूदकडून युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्याची सुटका, ‘असा’ रंगला सुटकेचा थरार…

Sunil Grover : शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच सुनील ग्रोव्हर कॅमेऱ्यासमोर, तब्येतीविषयी म्हणाला…

स्वतंत्र राहण्याच्या धडपडीत अरुंधती पडणार एकटी? बाईचं एकटं राहणं अजूनही पचनी का पडत नाही?

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....