“मी त्याच्यावर प्रेम केलं, आम्ही एका घरात राहिलो, पण तो मला सोडून गेला”, व्हॅलेंटाईन वीकमध्ये राखी सावंतचं हार्टब्रेक

राखी सावंतने व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या ब्रेकअप आणि घटस्फोटाची घोषणा केली आहे. आपला पती रितेशपासून आपण वेगळं होतं असल्याचं तिनं म्हटलंय.

मी त्याच्यावर प्रेम केलं, आम्ही एका घरात राहिलो, पण तो मला सोडून गेला, व्हॅलेंटाईन वीकमध्ये राखी सावंतचं हार्टब्रेक
राखी सावंतImage Credit source: google
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 11:48 AM

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. तिची विधानं, तिचे फोटो नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. राखीच्या लव्ह अफेअर्सवर तर उघडपणे चर्चा होते. राखीने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट केली जी भलतीच चर्चेत आहे. ही पोस्ट आहे तिच्या हार्टब्रेकची. राखी सावंत आणि रितेश (Ritesh) यांनी 3 वर्षांपुर्वी लग्न केल्याचं राखीने एका मुलाखतीत सांगितलं. तसंच आता जड अंतकरणाने आपण वेगळे होत असल्याचं तिनं म्हटलंय. “मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं. आम्ही एकत्र एका घरात राहिलो. पण एकेदिवशी रितेश अचानक बॅग भरून निघून गेला. त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न दिल्याने तो काही कायदेशीर अडचणीत आला आहे आणि आता त्याला माझ्यासोबत राहायचं नाही, असं सांगत तो निघून गेला असं सांगून तो निघून गेला.”, असं राखी सावंतने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

राखी सावंतचं हार्टब्रेक

राखी सावंतने व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या ब्रेकअप आणि घटस्फोटाची घोषणा केली आहे. आपला पती रितेशपासून आपण वेगळं होतं असल्याचं तिनं म्हटलंय. तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय, “मला कल्पना आहे की उद्या व्हॅलेंटाईन डे आहे मात्र त्याआधी मी एक निराशाजनक बातमी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी आणि रितेशने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. त्याला निरोगी आयुष्य लाभो. मला इतके दिवस समजून घेतल्याबद्दल धन्यवाद”, असं राखीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.

“बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मला समजलं की रितेशचं लग्न झालंय आणि त्याला एक बाळही आहे. तेव्हा माझं मन तुटलं. मी कोणत्याही स्त्री किंवा मुलावर अन्याय करू शकत नाही. पण नंतर रितेशनेच मला सांगितलं की आपण एकत्र राहिलं पाहिजे. आम्ही 6 महिने एकमेकांशी व्हॉट्सअॅप चॅट केलं. माझी खात्री पटावी म्हणून रितेशने मला त्याच्या घराचा पत्ता, बँक खात्याचे तपशील मला पाठवलं. त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं. आमचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं. आता आम्ही वेगळे होतोय. पण जर त्याचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आणि त्याला माझ्याकडे परत यायची इच्छा असेल तर मी त्याची वाट पाहीन”, असं राखी म्हणाली आहे.

राखीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या हार्टब्रेकनंतर अनेकांनी कमेंट करून तिला यातून सावरण्यासाठी बळ दिलं आहे.

संबंधित बातम्या

Gangubai Kathiawadi : बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गंगुबाईचा बोलबाला, आलिया भट्ट चित्रपटाच्या प्रीमियरसाठी रवाना!

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सेलिब्रिटींचं आणि आपलं सेम असतं… के. एल. राहुलची अथिया शेट्टीसाठी इन्स्टा पोस्ट, म्हणाला…

धकधक गर्ल माधुरी दीक्षितला पाहून कपिल शर्मा स्वतःला तिच्यासोबत सेल्फी घेण्यापासून रोखू शकला नाही, पाहा खास फोटो!

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.