डोक्यात कढई, छातीला डबे, कमरेला किसणी Rakhi Sawant चा विचित्र डान्स, सोशल मीडियावर धुमाकूळ!

राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्रामला एक व्हीडिओ शेअर केलाय. ज्यात ती बेले डान्स करताना दिसतेय. डोक्यात कढई, हातात चमचा छातीला डबे आणि कमरेवर खिसणी लावत राखीने एक विचित्र डान्स व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.

डोक्यात कढई, छातीला डबे, कमरेला किसणी Rakhi Sawant चा विचित्र डान्स, सोशल मीडियावर धुमाकूळ!
राखी सावंतImage Credit source: Rakhi Sawant instagram
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 10:56 AM

मुंबई : राखी सावंत… बॉलिवूडमधलं असं नाव जिच्या नावासमोर केवळ व्हायरल हाच शब्द चपखल बसतो. राखी सावंत (Rakhi Sawant) बोलली, व्हायरल होतं. राखीने फोटो शेअर केला, व्हायरल होतो आणि राखीने एखादा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला मग तर तो वाऱ्याच्या वेगाने तुमच्या माझ्या मोबाईलपर्यंत पोहोचतो. आताही राखीने एक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर (Rakhi Sawant Instagram ) शेअर केला आणि तो व्हायरल झाला. हा व्हीडिओ आहे राखीच्या डान्सचा. राखीने अंगाला भांडी चिकटवत डान्स केलाय. त्याचा व्हीडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला.

राखीचा व्हायरल व्हीडिओ

राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्रामला एक व्हीडिओ शेअर केलाय. ज्यात ती बेले डान्स करताना दिसतेय. डोक्यात कढई, हातात चमचा छातीला डबे आणि कमरेवर किसणी लावत राखीने एक विचित्र डान्स व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हीडिओत राखी म्हणते, “तुम्ही म्हणत असाल की हे मी काय घातलंय? तर हा व्हीडिओ बघा. तर मी तुम्हाला बेले डान्स शिकवणार आहे.” अंगावरची भांडी वाजवत तिने डान्स कसा करायचा हे सांगितलं आहे. विशेष म्हणजे तिने या व्हीडिओवर स्वत:च हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.

नेटकरी काय म्हणतात?

नेटकऱ्यांनी राखीच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.” हा खरंच वेगळा प्राणी आहे. जगापेक्षा वेगळा”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.

“वेडी झाली आहेस का?”, असं एका नेटकऱ्याने राखीला म्हटलंय. “ही काहीही करतेय. ही तर हद्द झाली”, असं दुसऱ्याने म्हटलंय. “तुला नेमकं झालंय काय?”, असं सवाल एका नेटकऱ्याने राखीला विचारलाय.

राखीचा आधी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ओ आन्टा वा गाण्यावरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. राखीने एका वेगळ्या अंदाजात या गाण्यावर डान्स केला होता.

संबंधित बातम्या

साऊथचा श्रीवल्ली विसरा,मराठीतली ‘पुष्पावल्ली’ पाहा…

‘आई कुठे काय करते’मधील यशची गर्लफ्रेंड खऱ्या आयुष्यात आहे इतकी ग्लॅमरस

अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा Summer Look; तुम्हीसुद्धा करू शकता ट्राय!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.