आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनचे (Raveena Tandon) वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रवी टंडन (Ravi Tandon) यांचं निधन झालं आहे. रवी टंडन यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रविना टंडनने स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिनं आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. “बाबा, तुम्ही नेहमी माझ्यासोबत असेच चालत असाल. मी नेहमी तुझ्यासारखंच राहण्याचा प्रयत्न करत राहिल. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. लव्ह यू बाबा”, असं रविना तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली आहे. रवी टंडन यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोक व्यक्त होत आहे.
रविना टंडनची इन्स्टाग्राम पोस्ट
रविना टंडनचे वडील आणि चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचं निधन झालं आहे. रविना टंडनने स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर तिनं आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. “बाबा, तुम्ही नेहमी माझ्यासोबत असेच चालत असाल. मी नेहमी तुझ्यासारखंच राहण्याचा प्रयत्न करत राहिल. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. लव्ह यू बाबा”, असं रविना तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली आहे.
रवि टंडन यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे
रविना टंडनचे वडील रवी टंडन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. नजराना, मुकद्दर, मजबूर, निर्माण ही त्यांच्या निवडक चित्रपटांची नावं सांगता येतील. याशिवाय त्यांनी अनहोनी आणि एक मैं और एक तू या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. रवी टंडन यांनी वीणा यांच्याशी लग्न केलं. त्याना रवीना आणि राजीव ही दोन मुलं आहेत. रविना अभिनेत्री आहे तर राजीवदे दिग्दर्शक आणि निर्माता आहेत.
रविना आणि तिच्या बाबांच खास नातं
रविना आणि तिचे वडिल रवी टंडन या दोघांचं नातं वडील-मुली पेक्षा मित्र-मैत्रिणीचं अधिक होतं. रविना आपल्या बाबांच्या खूप जवळ होती त्यांच्या जाण्याने रविनाला दुखावली गेली आहे.
संबंधित बातम्या