Shilpa Shetty | शिल्पा शेट्टी-राज कुंद्राचं नातं तुटण्याच्या वळणावर? जवळच्या मैत्रिणीने उलगडलं गुपित

ड्युप्लेक्स फ्लॅट आणि हिरे अवैध मार्गातून आपल्या घरात येत असल्याची शिल्पाला पुसटशीही कल्पना नव्हती. त्यामुळे राजने दिलेल्या भेटवस्तूंना स्पर्शही करण्याची आता तिची इच्छा नाही. शिल्पा आत्मनिर्भर आहे आणि ती आपल्या मुलांची काळजी घेऊ शकते, असं शिल्पाच्या मैत्रिणीने सांगितल्याची माहिती आहे.

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टी-राज कुंद्राचं नातं तुटण्याच्या वळणावर? जवळच्या मैत्रिणीने उलगडलं गुपित
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 9:19 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्यापासून वेगळं राहण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अश्लील चित्रफीत प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यामुळे शिल्पाही कायद्याच्या कचाट्यात सापडली होती. त्यामुळे राजपासून अंतर ठेवून राहण्याचा शिल्पाचा विचार आहे. शिल्पाच्या एका मैत्रिणीनेच तिच्या खासगी आयुष्यातील निर्णयाविषयी खुलासा केल्याचा दावा ‘बॉलिवूड हंगामा’ या न्यूज पोर्टलने केला आहे.

शिल्पाच्या मैत्रिणीचा दावा काय?

ड्युप्लेक्स फ्लॅट आणि हिरे अवैध मार्गातून आपल्या घरात येत असल्याची शिल्पाला पुसटशीही कल्पना नव्हती. त्यामुळे राजने दिलेल्या भेटवस्तूंना स्पर्शही करण्याची आता तिची इच्छा नाही. शिल्पा आत्मनिर्भर आहे आणि ती आपल्या मुलांची काळजी घेऊ शकते. हंगामा 2 आणि निकम्मा यानंतर आणखी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचं तिने बॉलिवूडमधील आपल्या निकटवर्तीयांनाही कळवलं आहे, असं शिल्पाच्या मैत्रिणीने सांगितल्याची माहिती आहे.

दिग्दर्शक अनुराग बसू आणि प्रियदर्शन यांनी आपल्या आगामी चित्रपटांची ऑफरही शिल्पाला दिल्याची माहिती आहे. मात्र याबद्दल शिल्पाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

स्वकमाईतून मुलांचं संगोपन करणार!

रिपोर्ट्सनुसार, शिल्पाला तिच्या मुलांना राजने चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशांपासून दूर ठेवायचे आहे. तिला राजची कमाई वापरायची नाही. रिअॅलिटी शो जज करून तिने स्वतः कमावलेल्या पैशातून ती मुलांचे संगोपन करणार आहे आणि आता ती आणखी चित्रपटांमध्ये देखील काम करणार आहे. चित्रपट निर्माते अनुराग बासू आणि प्रियदर्शन यांनी शिल्पाला वचन दिले आहे की, ते तिला चित्रपटात काम देतील. जरी, राज बराच काळ पोलीस कोठडीत राहिला, तरी अभिनेत्रीला अधिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

चाहत्यांना दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा

जन्माष्टमीच्या निमित्ताने सर्व चाहत्यांचे अभिनंदन करताना शिल्पाने एक संदेश लिहिला की, “श्री कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा. बाल गोपाळ आपल्या सर्वांवर आशीर्वाद देवो.” यासह, शिल्पाने भगवद्गीतेतील एक ओळ लिहिली की, ‘देव त्यांच्याबरोबर आहे ज्यांचे मन आणि आत्मा इच्छा आणि क्रोधांपासून मुक्त आहेत आणि जे स्वतःला ओळखतात.’

शिल्पाचे प्रेक्षकांना आवाहन

शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा 2’ हा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे शिल्पाने 10 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. शिल्पा या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होती, पण राज कुंद्राला नेमकी चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधी अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे शिल्पाच्या सगळ्या उत्साह आणि आनंदावर विरजण पडले.

मात्र शिल्पाने चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. तिने असा संदेश लिहिला होता की, हा चित्रपट बनवण्यासाठी अनेकांनी खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे हा चित्रपट नक्की बघा. चित्रपटात शिल्पा व्यतिरिक्त परेश रावल, मीजान जाफरी आणि राजपाल यादव होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता लवकरच शिल्पा शेट्टी ‘निकम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पासोबत अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटीया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

संबंधित बातम्या :

राज कुंद्रा काँट्रोव्हर्सी दरम्यान शिल्पा शेट्टीची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, ‘कोणतीच शक्ती महिलेला…’

पित्याच्या ‘काळ्या कमाई’पासून मुलांना दूर ठेवणार, शिल्पा शेट्टी राज कुंद्राचं घर सोडून वेगळी राहणार?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.