एक्स बॉयफ्रेंडसोबत चक्क ‘या’ ठिकाणी दिसली सुष्मिता सेन, चाहते हैराण, नेटकऱ्यांनी थेट विचारले ललित मोदी कुठे?
बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आरोग्यामुळे चर्चेत होती. सुष्मिता सेन नेहमीच तिच्या फिटनेसकडे लक्ष देते. नुकताच सुष्मिता सेन हिने तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये. नुकताच थोड्या वेगळ्या कारणामुळे सुष्मिता सेन ही चर्चेत आलीये.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सुष्मिता सेन (Sushmita Sen) यावेळी चित्रपटांमुळे नाही तर तिच्या आरोग्यामुळे चर्चेत होती. विशेष म्हणजे सुष्मिता सेन ही सोशल मीडियावर (Social media) चांगलीच सक्रिय दिसत असून आपल्या चाहत्यांसाठी ती सध्या व्यायामाचे आणि डाएटचे व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सुष्मिता सेन हिला हार्ट अटॅक (Heart attack) आला होता. यानंतर सुष्मिता सेन हिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. विशेष बाब म्हणजे सुष्मिता सेन हिने अटॅक आल्यानंतर काही दिवसांमध्येच तिने चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात केलीय. नुकताच सुष्मिता सेन ही तिच्या रिलेशिनशिपमुळे चर्चेत आलीये.
एका पार्टीत सुष्मिता सेन हिला पाहुण तिच्या चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसला. कारण या पार्टीमध्ये सुष्मिता सेन ही चक्क तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत पोहचली. सुष्मिता सेन ही सध्या तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याच्यासोबत स्पाॅट होताना सतत दिसत आहे. इतकेच नाही तर यावेळी चक्क ती रोहमन शॉल याच्यासोबत पार्टीत पोहचली.
रोहमन शॉल आणि सुष्मिता सेन यांना पाहुण अनेकांनी या दोघांचे परत एकदा काही तरी सुरू झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचे अफेअर सुरू असून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यांनी आपले नाते स्वीकारले होते. इतकेच नाही तर यावेळी ललित मोदी यांनी काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.
ललित मोदी सध्या भारताबाहेर असून ते लंडनमध्ये राहतात. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ललित मोदी यांनी जाहिर केले होते की, आपण अभिनेत्री सुष्मिता सेन हिला डेट करत आहोत. ललित मोदी यांच्या पोस्टनंतर अनेकांनी यांच्यावर टिका करण्यास देखील सुरूवात केली होती. मात्र, अचानकच सुष्मिता सेन हिला एक्स बाॅयफ्रेंडसोबत पाहुण अनेक चर्चांना उधाण आले आहे.
सुष्मिता सेन ही कायमच तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते. सकाळी लवकर उठून सुष्मिता सेन ही व्यायाम देखील करते, व्यवस्थित डाएट देखील फाॅलो करते. हे सर्व करूनही सुष्मिता सेन हिला हार्ट अटॅक आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. मात्र, हार्ट अटॅकनंतर काही दिवसांमध्येच पुन्हा एकदा सुष्मिता सेन सक्रिय झाली असून तिने परत एकदा आपल्या फिटनेसकडे लक्ष केंद्रित केले आहे. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांनासोबत पाहून अनेकांनी थेट विचारले ललित मोदी कुठे आहे?