मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. फरहान आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला त्यांचे कुटुंबीय (Farhan And Shibani Wedding) आणि त्याच्याजवळची मित्रमंडळी उपस्थित होते. फरहान आणि शिबानी यांनी खंडाळ्यातील त्यांच्या फार्म हाऊसवर लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नानंतर फरहानची पूर्व पत्नी अधुना भाबानी हीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात तिने “मी त्यांना ब्लॉक करेन”, असं म्हटलंय. “हॅन्सअप ट्रोलर्स… जे कुणी मला ट्रोल करत आहेत. त्यांना मी ब्लॉक करेन”, असं अनुधाने म्हटलंय. “माझ्या विरोधात निगेटिव्ह लिहिणाऱ्यांना इथे स्थान नाही. अश्या लोकांना ब्लॉक केलं जाईल” असं अनुधाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.
अधुनाची इन्स्टाग्राम पोस्ट
अनुधाने एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. ज्यात तिने ट्रोलर्सना इशारा दिला आहे. “हॅन्सअप ट्रोलर्स… जे कुणी मला ट्रोल करत आहेत. त्यांना मी ब्लॉक करेन”, असं अनुधाने म्हटलंय. “माझ्या विरोधात निगेटिव्ह लिहिणाऱ्यांना इथे स्थान नाही. अश्या लोकांना ब्लॉक केलं जाईल” असं अनुधाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.
तिच्या या पोस्टची सध्या रोजदार चर्चा होतेय. अनेकांनी तिच्या या पोस्टवर आपली मतं मांडली आहेत. कमेंटच्या माध्यमातून अनेकांनी तिला खंबीर राहण्याचा सल्ला दिला आहे.
फरहान आणि अधुना भाबानी यांचं नातं
फरहान अख्तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चेत असतो. फरहानने 2000 मध्ये अधुना भाबानीशी लग्न केलं होतं. फरहान आणि अधुना यांना दोन मुलेही आहेत. पण 2017 मध्ये फरहान आणि अधुना वेगळे झाले, त्यांचा घटस्फोट झाला. फरहान आणि अधुना यांच्यात घटस्फोटाचं कारण फरहानचे विवाहबाह्य संबंध असल्याचं म्हटलं बोललं जात होतं.
संबंधित बातम्या