‘गेहराईयाँ’च्या घवघवीत यशानंतर दीपिका पादुकोणचा शाहरूख खानसोबत नवा चित्रपट, ‘या’ तारखेला होणार रिलीज
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या गेहराईयाँ या चित्रपटाने अनेकांनाची मनं जिंकली. या चित्रपटातील दीपिकाच्या कामाचं विशेष कौतुक झालं. गेहराईयाँच्या घवघवीत यशानंतर दीपिका पादुकोणचा नवा सिनेमा येतोय. या सिनेमात ती पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसोबत प़डद्यावर दिसणार आहे.
आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukon) गेहराईयाँ (Gehraiya) या चित्रपटाने अनेकांनाची मनं जिंकली. या चित्रपटातील दीपिकाच्या कामाचं विशेष कौतुक झालं. गेहराईयाँच्या घवघवीत यशानंतर दीपिका पादुकोणचा नवा सिनेमा येतोय. या सिनेमात ती पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसोबत (Shahrukh Khan) प़डद्यावर दिसणार आहे. ‘पठाण’ (Pathan) असं या सिनेमाचं नाव आहे. याबाबतची माहिती तिने इन्स्टाग्रामवरून दिली आहे. जॉन अब्राहम (Jon Abraham) देखील या सिनेमात आहे. दीपिका पादुकोणने याबाबतची माहिती तिच्या इन्स्टाग्रामवर दिली आहे. तसंच शाहरूख खाननेही आपल्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. पुढच्या वर्षी 25 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
दीपिकाची इन्स्टाग्राम पोस्ट
दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत पठाण सिनेमाबाबत माहिती दिली आहे. पठाण सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार असल्याचं तिने सांगितलं आहे. या पोस्टमध्ये शाहरूख आणि जॉन यांच्यासोबतच यशराज फिल्सला तिने टॅग केलं आहे.
View this post on Instagram
शाहरूखची पोस्ट
शाहरूख खाननेही या सिनेमासंदर्भात पोस्ट केली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय, “मला याची जाणिव आधीच खूप उशीर झालाय. पण 25 जानेवारी ही तारिख लक्षात ठेवा… कारण आता पठाणची वेळ सुरू होतेय….”
View this post on Instagram
पठाणची पहिली झलक
शाहरूख खानचा हा नवा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होतोय. या सिनेमात दीपिका आणि जॉन यांचं काम पहायला मिळतंय. तर शाहरूखचा लूक अद्याप समोर आलेला नाही. त्याचे डायलॉग मात्र सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत.
सिनेरसिकांच्या कमेंट
शाहरूख आणि दीपिका ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याने सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अनेकांनी कमेंट करत आपल्याला या सिनेमा बाबत उत्सुकता असल्याचं म्हटलंय.
संबंधित बातम्या