बॉलिवूडमधील पाच हिंदी चित्रपट, ज्यांचे अफगाणिस्तानशी कनेक्शन, पाहा कोणते आहेत ‘हे’ चित्रपट…

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थिती आता सगळ्या जगासमोर आहे. रविवार 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या घरावर देखील हल्ला केला. त्यानंतर राष्ट्रपती घनी यांनी देश सोडला.

बॉलिवूडमधील पाच हिंदी चित्रपट, ज्यांचे अफगाणिस्तानशी कनेक्शन, पाहा कोणते आहेत ‘हे’ चित्रपट...
Afghanistan movies
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 12:43 PM

मुंबई : अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थिती आता सगळ्या जगासमोर आहे. रविवार 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या घरावर देखील हल्ला केला. त्यानंतर राष्ट्रपती घनी यांनी देश सोडला. अफगाणिस्तानमध्ये अशा परिस्थिती नवीन नाही. भारताचे अफगाणिस्तानशी घनिष्ट संबंध आहेत. आपल्या चित्रपटांमध्येही अफगाणिस्तानची उपस्थिती दिसून आली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.

काबुल एक्सप्रेस

दिग्दर्शक कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. तेच कबीर खान ज्यांनी नंतर ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट बनवला. ‘काबुल एक्सप्रेस’मध्ये जॉन अब्राहम आणि अर्शद वारसी सुहेल आणि जय या दोन भारतीय पत्रकारांच्या भूमिकेत होते. तेथील परिस्थितीचा अहवाल देण्याच्या हेतूने हे दोघेही अफगाणिस्तानला जातात. जिथे त्याची भेट अमेरिकन पत्रकार जेसिकाशी होते. तिघेही एकत्र येतात. ते त्यांच्या प्रवासाला जात असतात की त्यांना इम्रान भेटतो, जो एक तालिबानी असून पाकिस्तानात पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. बंदुकीचा धाक दाखवत इम्रान त्यांच्यात सामील होतो. वाटेत आधी सिगारेट शेअर केली जाते, मग इम्रान खान आणि कपिल देव यांच्यात कोण चांगले आहे यावर गंभीर चर्चा होते. काही मैल चालल्यावर वाटेत एक बंदूकधारी व्यक्ती त्यांचा मार्ग अडवतो. हा एक अफगाणी तरुण आहे, ज्याने आपल्या देशाला डोळ्यांसमोर उध्वस्त होताना पाहिले आहे. तो तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न करत आहे.

एस्केप फ्रॉम तालिबान

हा चित्रपट सुष्मिता बॅनर्जी यांच्या आत्मचरित्र ‘अ काबुलवालाज बंगाली वाईफ’ वर आधारित आहे. कथा आहे कोलकातामध्ये राहणाऱ्या सुष्मिताची. अफगाणिस्तानातून व्यवसायासाठी भारतात आलेल्या बिझनेसमन जम्बाज खान यांना थिएटर रिहर्सल दरम्यान सुष्मिता भेटली. मग त्यांचे प्रेम जुळते आणि दोघेही काही दिवसांनी गुपचूप लग्न करतात. पण सुष्मिताच्या कुटुंबीयांना या लग्नाची माहिती मिळताच, त्यांनी तिचा घटस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे सुष्मिता कोलकाता सोडून पतीसोबत त्याच्या घरी अफगाणिस्तानला गेली. तिथे गेल्यावर त्याला कळते की, त्याने आधीच लग्न केले आहे.

धक्का बसतो पण ती परतही जाऊ शकत नाही. हतबल सुष्मिता त्याच्या कुटुंबासोबत राहू लागते. तिथे राहताना, सुष्मिता तिच्या कुटुंबाला आणि गावातील महिलांना त्यांच्या पतींच्या मनमानीला विरोध करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास जागरूक करू लागते. सुष्मिताची ही जेव्हा तालिबानपर्यंत पोहोचतात, तेव्हा ते तिच्यावर खूप अत्याचार करतात. काही वर्षांनी, गावच्या प्रमुखांच्या मदतीने सुष्मिता तिथून पळून जाण्यात यशस्वी होते. भारतात आल्यानंतर सुष्मिताने 1995 मध्ये ही कथा लिहिली. ज्यावर दिग्दर्शक उज्जल चट्टोपाध्याय यांनी 2003 मध्ये ‘द एस्केप फ्रॉम तालिबान’ हा चित्रपट बनवला. मनीषा कोईराला यांनी चित्रपटात सुष्मिताची भूमिका साकारली होती आणि नवाब शाहने जंम्बाज खानची भूमिका साकारली होती. सुष्मिता बॅनर्जी 2012 पर्यंत भारतात राहिल्या. 2013 मध्ये त्या अफगाणिस्तानातील त्यांच्या गावी परत गेल्या आणि सार्वजनिक सेवा करू लागल्या. जिथे काही दिवसांनी तालिबान्यांनी त्यांची हत्या केली.

काबुलीवाला

‘काबुलीवाला’ हा चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या ‘काबुलीवाला’ या लघुकथेवर आधारित आहे. कथा एका फळ विक्रेत्याची आहे, जो दरवर्षी कलकत्त्याला येतो आणि रस्त्यावर फळे विकतो. फळे विकताना त्याला एक पाच वर्षांची मुलगी मिनी भेटते. आता तो रोज मिनीला फळे देतो आणि तिच्याबरोबर खेळतो. काबुलीवाला मिनीवर स्वतःच्या मुली प्रमाणे प्रेम करू लागतो. एके दिवशी एक गुंड काबुलीवालांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतो. दोघेही हाणामारीत खाली पडतात. यानंतर पोलीस काबुलीवालाला पकडतात आणि त्याला तुरुंगात टाकतात. बऱ्याच वर्षांनंतर काबुलीवालाची तुरुंगातून सुटका होते. त्याची सुटका होताच तो सर्वात आधी मिनीच्या घरी जातो. मिनी आता तरुण आहे आणि ‘काबुलीवाला’ आता म्हातारा झाला आहे. त्यामुळे ती त्याला ओळखू शकली नाही. टागोरांची ही कथा बऱ्याच वेळा चित्रपट पडद्यावर आणली गेली आहे.

बायोस्कोपवाला

रॉबी बसू हा एक फॅशन फोटोग्राफर आहे. तो कामानिमित्ताने काबूलला जात आहे. फ्लाईटमध्ये चढण्यापूर्वी त्याला त्याच्या मुलीशी बोलायचे आहे, पण ते होऊ शकत नाही. तो पत्र लिहून विमान पकडतो, हे विमान क्रॅश होते. पॅरिसमध्ये शिकणारी मुलगी मिनी कोलकाताला परतते. परतल्यानंतर तिला कळते की, मरण्यापूर्वी वडिलांनी एका कैद्याची सुटका करून त्याला ताब्यात घेण्यासाठी दहा वर्षे लढा दिला होता. त्याची काळ कोठडी आता संपली आहे आणि अल्झायमरने ग्रस्त एक म्हातारा आता मिनीची जबाबदारी आहे. मिनी या जबाबदारीमुळे चिडली आहे. हा माणूस दुसरा कोणी नसून तिचा बालपणीचा ‘बायोस्कोप’ आहे, हे कळल्यावर तिचे मन बदलते.

बायोस्कोपवाला हा असा व्यक्ती आहे, जो मिनीला गोष्ट सांगायला शिकवतो. जो अफगाणिस्तानातून आलेला असून, खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत होता. आता मिनीला काही प्रश्न पडले आहेत. तिचे वडील काबूलला का जात होते? बायोस्कोपवाले रहमत खानचे कुटुंब कोठे आहे? खरच रहमत खानने हत्या केली होती का? जर होय तर का? रहमत खानची मुलगी राबियाचे रहस्य काय? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मिनीने पुढे काय करावे? प्रश्नांची उत्तरे शोधत मिनी सोनागाची ते कोलकाताच्या रेड लाईट एरिया ते अफगाणिस्तान पर्यंत भटकते. या अनुक्रमात, बायोस्कोपचे आयुष्य अनेक लोकांच्या आठवणींच्या मदतीने उलगडले जाते. यामध्ये सोनागाची, वहिदा आणि गजाला येथील दलाल, अफगाणिस्तानातून रहमतसोबत आलेल्या दोन महिला, रवी बसूची डायरी, त्याचे शेवटचे पत्र आणि मिनीच्या आठवणींचा समावेश आहे.

काफिला

वर्ष 2000, देशभरात मंदी पसरली आहे. सामान्य माणसाला घरातून बाहेर पडणे अवघड आहे. प्रत्येकाला परदेशात जाऊन पैसे कमवायचे असतात, जेणेकरून ते आपले घर सांभाळू शकतील. त्याचप्रमाणे, काही भारतीय आणि काही बांगलादेशी आणि पाकिस्तानी, दिल्ली एजंट, रशीदसोबत त्यांना ग्रेट ब्रिटनमध्ये नेण्याचा करार करतात. त्या सर्वांनी त्यांच्या आयुष्यातील सर्व ठेवी आणि भांडवल जोडून रशीदला देतात. जहाजाने प्रवासाला निघतात. वाटेत तीव्र वादळामुळे जहाज हरवते. जेव्हा ते जमिनीवर उतरतात, रशीदसह, त्यांना तेथे एक अफगाण मार्गदर्शक सापडतो. जो त्यांना पुढे नेण्याचा दावा कोण करतो. पण काही काळानंतर त्यांच्या आयुष्यात वेगळीच समस्या येते. 2007मध्ये रिलीज झालेला ‘काफिला’ हा सनी देओल स्टारर चित्रपट आहे. सनीसोबत, सुदेश बॅरी आणि सना नवाजही चित्रपटात दिसले आहेत.

हेही वाचा :

अफगाणिस्तानवर तालिबानी कब्जानंतर सोशल मीडियावर व्यक्त झाली कंगना, म्हणाली ‘मोदीजी नसतील तर…’

‘देवमाणूस’ मालिकेचा दुसरा सीझन येणार? पाहा निर्माती श्वेता शिंदे काय म्हणाली…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.