आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूड गायिका नेहा कक्करची (Bollywood Singer Neha Kakkar) गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिग असतात. नेहाचं एक नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. नेहाचं नाराजकी (Narazgi Song Release) हे नवं गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. या गाण्याला अवघ्या दोन तासात 25 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 2 लाखांहून अधिकांनी लाईक करून या गाण्याला पसंती दिली आहे. तर एक हजाराहून अधिकांनी कमेंट करून गाण्याविषयी आपली मतं मांडली आहेत. नेहा कक्करने स्वत: या गाण्याच्या कमेंट बॉक्समंध्ये एक कमेंट केली आहे. “मला नेहमीचं अश्या प्रकारचं गाणं गायचं होतं आणि तसं गाणं मी गायलं आहे. मला आशा आहे की तुम्हालाही हे गाणं आवडलं असेल”, अशी कमेंट नेहाने केली आहे.
नेहा कक्करचं नवं गाणं
गायिकी नेहा कक्करचं नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. “खैरियत भी पुछते नहीं, ना बात करते हों…” असे या गाण्याचे बोल आहेत. सोनल प्रधानने हे गाणं लिहिलं आहे तर म्युझिकही तिनेच दिलं आहे.
नेहाची इन्स्टाग्राम पोस्ट
“खैरियत भी पुछते नहीं, ना बात करते हों”, असं म्हणत आपलं नाराजगी हे नवं गाणं रिलीज झाल्याचं नेहाने इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे. या गाण्याची एक झलकही तिने पोस्ट केली आहे.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
“नेहा तुझा आवाज मला नेहमीचं तुझ्या प्रेमात पाडतो. तु अशीच दर्जेदार गाणी गात राहा आणि मला तुझ्या प्रेमात पाडत राहा”, असं एकाने म्हटलंय. दुसऱ्याने म्हटलंय की “गाण्याचे शब्द हृदयात घर करतात. गाण्याचं म्युजिक खूपच सुंदर आहे.”
संबंधित बातम्या