Net Worth | बंगले आणि लक्झरी सीरीजच्या महागड्या गाड्या, जाणून घ्या प्रियंका चोप्राची संपत्ती किती?

बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास करणारी प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. प्रियंका आपल्या अभिनयाने चाहत्यांना नेहमीच वेड लावते. फॅशनची मेघना असो वा बर्फीमधील झिलमिल, प्रियांकाने स्वत:ला सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये चपखल बसवलं.

Net Worth | बंगले आणि लक्झरी सीरीजच्या महागड्या गाड्या, जाणून घ्या प्रियंका चोप्राची संपत्ती किती?
प्रियंका चोप्रा
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 9:14 AM

मुंबई : बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास करणारी अभिनेत्री  प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. प्रियंका आपल्या अभिनयाने चाहत्यांना नेहमीच वेड लावते. फॅशनची मेघना असो वा बर्फीमधील झिलमिल, प्रियांकाने स्वत:ला सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये चपखल बसवलं. प्रियंका अभिनयाबरोबरच कमाईतही बड्या अभिनेत्रींना मागे सोडते.

प्रियांकाने आज तिच्या कारकिर्दीत जो काही टप्पा गाठला आहे, तो तिने स्वतःच्या हिमतीवर गाठला आहे. आज प्रियंका चोप्राकडे अनेक आलिशान घरे, लक्झरी वाहने आहेत आणि तिच्याकडे कमाईचे अनेक पर्याय आहेत.

प्रियंकाची कोटींची कमाई

मीडिया रिपोर्टनुसार प्रियंका चोप्राची एकूण मालमत्ता सुमारे 28 दशलक्ष डॉलर्स (200 कोटी रुपये) आहे. तर 2019च्या फोर्ब्स इंडियाच्या यादीमध्ये प्रियंकाची वार्षिक कमाई 23.4 कोटी रुपये असल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे जीक्यू मॅगझिन 2020च्या वृत्तानुसार प्रियंका आणि तिचा नवरा निक जोनास यांची मालमत्ता एकत्रित केल्यास हे जोडपे 734 कोटी रुपयांचे मालक आहेत.

प्रियंकाच्या कमाईचे साधन

प्रियांका चोप्राकडे कमाई करण्याची वेगवेगळी साधने आहेत. बातमीनुसार अभिनेत्री एका प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी सुमारे 4-5 कोटी रुपये घेते. याशिवाय 2015 मध्ये प्रियंकाने पर्पल पेबल पिक्चर्स (पीपीपी) नावाची कंपनी देखील स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातूनही अभिनेत्री कमाई करत आहे.

बर्‍याच उत्पादनांसाठी प्रियंका चोप्राच्या ब्रँड अ‍ॅन्डॉर्सेस देखील करते. जर या बातमीवर विश्वास ठेवला, तर प्रियांका चोप्राने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी 2 कोटी रक्कम घेते.

प्रियांकाच्या गाड्या

प्रियंका चोप्राकडेही अनेक लक्झरी वाहने आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीकडे रोल्स रॉयल, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, पोर्श कायेन, कर्मा फिशर यासारख्या महागड्या वाहनांची मालकी आहे. अभिनेत्रीच्या या वाहनांची किंमत लाखो-कोटींमध्ये आहे.

प्रियंकाचे घर

प्रियंका चोप्राकडेही अनेक आलिशान घरे आहेत, अभिनेत्रीकडे मुंबई ते लॉस एंजेलिस पर्यंत आलिशान बंगले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये प्रियांकाचे एक अतिशय आलिशान घर आहे, ज्याची किंमत कोटींमध्ये असल्याचे म्हटले जाते. याशिवाय प्रियांकाचे मुंबईत घर आहे, तर गोव्यातही तिच्याकडे आलिशान घर आहे. प्रियंकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे, तर निक जोनासशी लग्नानंतर आता अभिनेत्री बहुतेक परदेशातच राहते. अभिनेत्रीने 2018मध्ये निक जोनासशी लग्न केले.

(Bollywood to Hollywood journey know about priyanka chopra’s net worth)

हेही वाचा :

कव्हर लाँच होताच करीना कपूरचा जलवा, पुस्तक बनले नंबर वन बेस्टसेलर!

बॉलिवूड डेब्यूपूर्वीच चर्चेत आलीये शनाया कपूर, सोशल मीडियावरील फोटोंनी वेधलं चाहत्यांच लक्ष!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.