शरद पवारांच्या त्या विधानावर विवेक अग्निहोत्रीने मांडले परखड मत, वाचा प्रकरण
शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेत द कश्मीर फाइल्स चित्रपटाचे निर्माता विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बॉलिवूडमध्ये (Bollywood) सर्वाधिक योगदान हे मुस्लिमांचे असल्याचे म्हटले आहे. शरद पवारांच्या या विधानानंतर मोठा गोंधळ निर्माण झालाय. नागपूरमध्ये बोलताना शरद पवारांनी हे वादग्रस्त विधान केलंय. आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) या विधानाचा समाचार बॉलिवूडमधून देखील घेतला जातोय. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि चित्रपट (Movie) निर्मात्यांना हे विधान खटके असून यावर बॉलिवूडमधून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झालीये.
इथे पाहा विवेक अग्निहोत्री यांची पोस्ट
शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेत द कश्मीर फाइल्स चित्रपटाचे निर्माता विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. शरद पवार यांच्या विधानानंतर विवेक अग्निहोत्रीने थेट शर्मनाक म्हटले आहे. शरद पवार म्हणाले की, बॉलिवूडमध्ये सर्वाधिक योगदान हे मुस्लिम बांधवांचेच आहे. मुस्लिमांमध्ये गुणवत्ता खूप जास्त आहे फक्त त्यांना संधी मिळण्याची गरज आहे. इतकेच नाही तर शरद पवार म्हणाले की, जर खरोखरच मुस्लीम समाजाला संधी मिळाली तर त्यांच्या पुढच्या पिढ्या या देशाच्या विकासात नक्कीच योगदान देतील.
शरद पवाऱ्याच्या विधानावर विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटले की, देवाने त्यांना जन्नत द्यावी. इतकेच नाही तर पुढे लिहिले की, हा हा हा… शर्मनाक, शर्मनाक, शर्मनाक… देव त्यांना जन्नत देवो…शरद पवार यांच्या विधानावर विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्टपणे आपला रोष व्यक्त केलाय. बॉलिवूडमधून शरद पवार यांच्या विधानाविरोधात अजून काही प्रतिक्रिया येऊ शकतात.