Rajesh Khanna |  ‘बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार’ राजेश खन्ना यांचा बायोपिक बनणार! फराह खान सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!

हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘पहिले सुपरस्टार’ म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यावर बायोपिक बनवण्यात येत आहे. राजेश खन्ना यांच्या 'डार्क स्टार : द लोनलीनेस ऑफ बीइंग राजेश खन्ना' या पुस्तकावर आधारित हा चित्रपट तयार केला जात आहे, ज्याची निर्मिती निखिल द्विवेदी करणार आहेत. त्याचबरोबर फराह खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

Rajesh Khanna |  ‘बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार’ राजेश खन्ना यांचा बायोपिक बनणार! फराह खान सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!
Rajesh Khanna Biopic
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 3:19 PM

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘पहिले सुपरस्टार’ म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यावर बायोपिक बनवण्यात येत आहे. राजेश खन्ना यांच्या ‘डार्क स्टार : द लोनलीनेस ऑफ बीइंग राजेश खन्ना’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट तयार केला जात आहे, ज्याची निर्मिती निखिल द्विवेदी करणार आहेत. त्याचबरोबर फराह खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

राजेश खन्ना यांच्या 79व्या जयंती (29 डिसेंबर) रोजी, त्यांच्यावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्याची यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही. देशातील सर्वात आयकॉनिक स्टार म्हणून आपले स्थान निर्माण करणाऱ्या काकांनी खऱ्या अर्थाने पहिले सुपरस्टार म्हणून जगाचे मनोरंजन केले. सलग 17 मोठे ब्लॉकबस्टर देणाऱ्या या सुपरस्टारवर आता चित्रपट बनणार आहे.

निखिल द्विवेदींनी विकत घेतले हक्क

निर्माते निखिल द्विवेदी यांनी गौतम चिंतामणीचे पुस्तक, ‘डार्क स्टार: द लोनलीनेस ऑफ बिइंग राजेश खन्ना’ याचे हक्क विकत घेतले आहेत, जे यापूर्वी बेस्टसेलर लीडमध्ये अग्रक्रमी होते. राजेश खन्ना यांना प्रेक्षक आणि चाहत्यांकडून मिळालेले प्रेम खूपच वेगळे होते, जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते आणि त्यानंतर कधीही पाहिले गेले नाही. त्यांची क्रेझ इतकी होती की, महिला चाहत्या त्यांना रक्ताने पत्र लिहायच्या, त्यांच्या फोटोंशी लग्न करायच्या.

चेतन आनंदच्या ‘आखरी खत’ (1966) मधून पदार्पण करणार्‍या या अभिनेत्याला यश आणि अपयश दोन्हीची चव चाखायला लागली. जतिन खन्ना या नावाने जन्मलेल्या अभिनेत्याला लोक इंडस्ट्रीत ‘काका’ या नावाने हाक मारायचे. गौतम चिंतामणी यांच्या पुस्तकात ज्या पद्धतीने अभिनेत्याचे चित्रण करण्यात आले आहे त्यातून बायोपिक बनवला जाणार असून, निखिल द्विवेदी अनेक वेगळे पैलू मोठ्या पडद्यावर आणणार आहेत. हा चित्रपट एक श्रद्धांजली ठरणार आहे.

कोण साकारणार राजेश खन्नांची भूमिका?

फराह खान दिग्दर्शित या चित्रपटात राजेश खन्ना यांची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भारतातील एकमेव सुपरस्टारच्या या भूमिकेत चपखल बसने कोणत्याही अभिनेत्यासाठी सोपे असणार नाही यात शंकाच नाही. परंतु, जर एखाद्या अभिनेत्याने या भूमिकेसाठी साइन अप केले आणि ती चोख बजावली, तर तो नक्कीच सर्वोत्कृष्ट ठरेल.

अधिकृत घोषणेनंतर कळणार पूर्ण माहिती!

याविषयी सांगताना निखिल द्विवेदी म्हणाले की, ‘होय, गौतम चिंतामणीच्या ‘डार्क स्टार’ या पुस्तकाचे हक्क आता माझ्याकडे आहेत आणि हा चित्रपट बनवण्यासाठी माझी फराह खानशी चर्चा सुरू आहे. मी सध्या एवढीच माहिती देऊ शकतो. चित्रपटाबाबत मोठी घोषणा होताच, मी ती नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. राजेश खन्ना यांचे चरित्र मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’

दुसरीकडे फराह खान म्हणाली की, ‘होय मी गौतमचे पुस्तक वाचले आहे आणि ते खूप आकर्षक आहे. खुपच रोमांचक कथा आहे. याबाबत सध्या आमची बोलणी सुरू असली, तरी मी याबाबत आता अधिक काही सांगू शकत नाही.’

हेही वाचा :

Bigg Boss 15 | सगळ्या स्पर्धकांचं एकमत, रश्मी देसाई-अभिजीत बिचुकले ‘तिकीट-टू-फिनाले’च्या शर्यतीतून बाद!

Sunny Leone | कंडोमची जाहिरात ते मधुबन गाणं, सनी लिओनी अन् वादांचं जुनं कनेक्शन!

Akshay Kumar | अक्षय कुमारला पुन्हा एकदा कोरोनाचा फटका! वाढत्या संसर्गामुळे ‘पृथ्वीराज’ ट्रेलर लांबणीवर!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.