बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध जोड्यांनी गुपचूप उरकली होती लग्न, सोशल मीडियावर खुलासा होताच चाहते अवाक्!
हे खरे आहे की भारतातील विवाह हे अगदीच सणांसारखे असतात, ज्याची तयारी काही महिन्यांपूर्वीच सुरू होते. बॉलिवूड सेलेब्सच्या लग्नातही हेच दृश्य पाहायला मिळते. प्रत्येक स्टारने आपले लग्न भव्य आणि चर्चित करण्याचा प्रयत्न केला. पण आता काळ बदलला आहे.
मुंबई : हे खरे आहे की भारतातील विवाह हे अगदीच सणांसारखे असतात, ज्याची तयारी काही महिन्यांपूर्वीच सुरू होते. बॉलिवूड सेलेब्सच्या लग्नातही हेच दृश्य पाहायला मिळते. प्रत्येक स्टारने आपले लग्न भव्य आणि चर्चित करण्याचा प्रयत्न केला. पण आता काळ बदलला आहे. आजच्या काळात, कलाकार नातेसंबंध गुप्त ठेवतात. परंतु, असे काही कलाकर आहेत, जे चाहत्यांच्या नजरेपासून दूर राहत गुपचूप लग्न करतात आणि नंतर सोशल मीडियावर लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित करतात.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांनी प्रथम गुपचूप लग्न केले आणि नंतर त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार जोडप्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या लग्नाच्या बातमीने केवळ चाहत्यांनाच नाही तर सेलेब्सनाही आश्चर्याचा धक्का दिला होता.
यामी गौतम आणि आदित्य धर
यामी गौतम आणि आदित्य धर यांनी 4 जून 2021 रोजी त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या जोडप्याने हिमाचल प्रदेशातील त्यांच्या कुटुंबांमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केले होते, ज्यात फक्त काही लोक उपस्थित होते. यामी गौतम आणि आदित्य यांचे साधे लग्न चाहत्यांना चांगलेच आवडले. एवढेच नाही तर त्यांच्या लग्नाची बातमी बऱ्याच सेलेब्ससाठी सुखद धक्क्यापेक्षा कमी नव्हती.
अली अब्बास जफर आणि अॅलिसिया
बॉलिवूड दिग्दर्शक अली अब्बास त्यांच्या चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये वर्चस्व गाजवतात. दिग्दर्शकाने 3 जानेवारी 2021 रोजी एलिसियाशी गुपचूप लग्न केले होते. त्याने 4 जानेवारी 2021 रोजी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला, ज्याद्वारे त्याने आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली. मात्र, अलीने या फोटोत पत्नी अॅलिसियाचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही. त्याचवेळी, अलीने 5 जानेवारी रोजी लग्नाचा आणखी एक फोटो शेअर केला, ज्यात तो पत्नी एलिसियासोबत रोमँटिक शैलीमध्ये दिसला.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे चित्रपट जगताचे पॉवर कपल आहेत. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये दोघांनी इटलीच्या टस्कनी येथे लग्न केले. दोघांनीही त्यांचे लग्न अतिशय गुप्त ठेवले, ज्यात फक्त त्यांचे जवळचे लोक उपस्थित होते. त्यांच्या लग्नानंतर, विराट आणि अनुष्काने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्याद्वारे त्यांनी चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आनंदाची बातमी दिली.
सना शेख आणि अनस सय्यद
अभिनेत्री सना शेख हिने 2020 मध्ये बॉलिवूडला निरोप देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. या व्यतिरिक्त, अभिनेत्रीने 22 नोव्हेंबर 2020 रोजी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला, जो तिच्या निकाहाचा होता. या फोटोद्वारे सनाने सांगितले होते की, तिने अनस सय्यदसोबत लग्न केले आहे. ती पती अनससोबत तिच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे.