Boney Kapoor | बोनी कपूर यांनी सांगितले बाॅलिवूड चित्रपट फ्लॉप ठरण्याचे कारण
आमिर खान, अक्षय कुमार यासारख्या स्टारचे चित्रपटही बाॅक्स आॅफिसवर जादू करू शकले नाहीयेत.
मुंबई : कोरोनानंतरचा काळ बाॅलिवूडसाठी काही चांगला राहिला नाहीये. बाॅक्स ऑफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट फेल जात आहेत. आमिर खान, अक्षय कुमार यासारख्या स्टारचे चित्रपटही बाॅक्स ऑफिसवर जादू करू शकले नाहीयेत. यादरम्यानच दक्षिणेकडील चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून साऊथ चित्रपटांचे रिमेक करण्याचा एक ट्रेंड बॉलिवूडमध्ये सुरू आहे. यामुळे सातत्याने प्रेक्षक बाॅलिवूडच्या चित्रपटांकडे पाठ फिरवत आहेत.
बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर कमाई करू शकत नसल्याची अनेक कारण देखील आहेत. बाॅलिवूड क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून नवीन चेहऱ्यांना अजिबातच संधी दिली जात नाहीये. प्रत्येक स्टार आपल्या मुला- मुलींना चित्रपटामध्ये लाॅन्च करण्यासाठी प्रयत्न करतायंत. हे प्रेक्षकांना अजिबातच आवडताना दिसत नाहीये.
बाॅलिवूडची चित्रपटे फेल जाण्याचे एक कारण बोनी कपूर यांनी देखील सांगितले आहे. विक्रम वेधा आणि जर्सी सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर का अपयशी ठरले याचा खुलासाही बोनी कपूर यांनी केलाय. बोनी कपूर लवकरच हेलन या मल्याळम चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे याच चित्रपटात त्यांची मुलगी अर्थात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे.
साऊथ रिमिक्सवर बोलताना बोनी कपूर म्हणाले की, साऊथ चित्रपटांचे हिंदी रिमेक बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होण्याचे एक कारण म्हणजे ते फक्त कॉपी पेस्ट केले जात आहे. इतकेच नाही तर साऊथच्या चित्रपटांचे टायटल्सही कॉपी पेस्ट केले जात असल्याने गेल्या काही दिवसांपासून चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत.