मुंबई : श्रीदेवी या भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. मात्र, अचानकपणे २०१८ साली श्रीदेवी (Sridevi) यांनी जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी यांच्या अशाप्रकारे जाण्याने चाहत्यांसोबत चित्रपटसृष्टीशी संबंधित सर्वांनाच मोठा धक्का बसला. अप्रतिम कारर्किद आणि आपल्या सौंदर्याने श्रीदेवीने अनेक वर्ष चाहत्यांचा मनावर अधिराज्य गाजवले आहे. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर ही बाॅलिवूडमध्ये आपले नशिब आजमवत आहे. श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर ही या वर्षी बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे. खुशी कपूर हिचा पहिला चित्रपट (Movie) २०२३ मध्ये रिलीज होईल. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि परिणामी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. जान्हवी कपूर हिचे वडील बोनी कपूर यांनीच मिली या चित्रपटाची निर्मिती केली होती. नुकताच आता बोनी कपूर यांनी एक मोठी घोषणा केलीये. बोनी कपूर हे श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित आहे बायोपिक तयार करणार आहेत.
चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी त्यांची दिवंगत पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बायोपिकची घोषणा ‘श्रीदेवी – द लाइफ ऑफ ए लेजेंड’ या नावाने केली आहे. बोनी कपूर यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
बोनी कपूर यांनी नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत द लाइफ ऑफ ए लेजें या बायोपिकची घोषणा केली आहे. धीरज कुमार यांनी हे पुस्तक लिहिले असून श्रीदेवी त्यांना आपल्या कुटुंबियांपैकी एक मानत होत्या. श्रीदेवी – द लाइफ ऑफ ए लेजेंड या पुस्तकावर अजूनही काम सुरू असल्याचे बोनी कपूर यांनी सांगितले आहे.
श्रीदेवी यांची पुण्यतिथी २४ फेब्रुवारी २०२३ रोजी असल्याने त्यांचा चित्रपट इंग्लिश विंग्लिश पुन्हा एकदा चीनमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. श्रीदेवी याच्या स्मरणार्थ हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.
इंग्लिश विंग्लिश या चित्रपटामध्ये प्रेक्षकांनी श्रीदेवी यांनी खूप जास्त प्रेम दिले होते. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट ठरला आहे. गौरी शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट होता.
काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले होते की, जान्हवी कपूर हिला कोणत्याच मोठ्या साऊथच्या चित्रपटाची आॅफर आली नाहीये. सध्याच ती कोणत्याच साऊथ चित्रपटामध्ये दिसणार नाहीये.
काही दिवसांपासून सतत चर्चा होत्या की, जान्हवी कपूर हिला साऊथचा एक चित्रपट भेटला आहे आणि ती लवकरच साऊथच्या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. मात्र, यावर स्वत: बोनी कपूर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.