Pushpa The Rise | ’83’ला ओव्हरटेक करत पुष्पाच्या हिंदी वर्जनचा धुमाकूळ, तब्बल 73 कोटीची कमाई
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णवाढीचा धोका पाहता अनेक मोठमोठ्या सिनेमांचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे आता लगेचतरी कोणताही सिनेमाला पुष्पाला टक्कर देण्यासाठी स्पर्धेत नाही आहे.
मुंबई : ‘अल्लू अर्जुनची एक्शन, रश्मिका मंधानाची अदा, पुष्पाच्या हिंदी वर्जनवर बॉक्सऑफिस फिदा!’ असं आम्ही नाही तर पुष्पाच्या हिंदी वर्जनच्या कमाईचे आकडेच बोलत आहेत. तब्बल 73 कोटी रुपयांची कमाई पुष्पाच्या हिंदी वर्जनने केली आहे. विशेष म्हणजे लवकरच हा सिनेमा 100 कोटी क्लबमध्येही जाईल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. आता फक्त 27 कोटी आणकी कमावले तर हा आकडा पुष्पाला पार करणं सहज शक्य आहे. विशेष म्हणजे रणवीर सिंहच्या 83 ला ओव्हरटेक करत पुष्पा सिनेमानं कमाईचे नवे विक्रम रचलेत.
संपूर्ण देशभरात 50 टक्के क्षमतेनं चित्रपटगृह सुरु असले, तरिही या 50 टक्के थिएटरही पुष्पासाठी हाऊसफुल्ल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशातील अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचे चाहते पुष्पा सिनेमाच्या प्रेमात पडले आहे. चौथ्या दिवशी पुष्पा द राईज या सिनेमानं दोन ते अडीच कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत पुष्पा सिनेमानं 73.50 कोटी रुपयांची कमाई केली असून येणाऱ्या दिवसांमध्ये हा आकडा आणखी वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज Boxofficeindia.com नं वर्तवला आहे.
100 कोटी क्लबमध्येही येणार?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णवाढीचा धोका पाहता अनेक मोठमोठ्या सिनेमांचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे आता लगेचतरी कोणताही सिनेमाला पुष्पाला टक्कर देण्यासाठी स्पर्धेत नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुष्पा सिनेमाची कमाई आणखी वाढू शकते, असं बोललं जातंय. त्यामुळे शंभर कोटीच्या क्लबमध्ये हा सिनेमा प्रवेश करेल, अशी शक्यता आहे.
An open field [no new release] is helping #Pushpa have an uninterrupted dream run… #Maharashtra and #Gujarat – these two markets – are unstoppable, especially Tier-2 and Tier-3 centres… [Week 4] Fri 1.95 cr. Total: ₹ 74.44 cr. #India biz. #PushpaHindi pic.twitter.com/QxFnBRYv5v
— taran adarsh (@taran_adarsh) January 8, 2022
17 डिसेंबरला झालं होतं दणक्यात प्रदर्शन
गेल्या वर्षी 17 डिसेंबरला पुष्पा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मुळात तेलुगु भाषेत असलेला हा सिनेमा मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदीतही डब करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमा रश्मिका मंधनाही प्रेक्षकांच्या आकर्षित करते आहे. सुकुमार यांनी हा सिनेमा लिहिला असून त्यांची या सिनेमाचं दिग्दर्शनही केलंय.
इतर बातम्या –
KGF Chapter 2 | यशच्या वाढदिवसाचं खास निमित्त, ‘KGF Chapter 2’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!
ना कपूर, ना खान; हे अस्सल अहिराणी गाण्याचं वाण! 246,449,914 Views घेणारं ‘ईकस केसावर फुगे’ पाहिलंत?