प्रसिद्ध अभिनेत्याचा बालपणातला फोटो, ओळखलंत का? या अभिनेत्याच्या प्रेमात पडलेल्या अभिनेत्रीने लग्न केलं नाही

फोटोमध्ये दिसत असणारा मुलगा हा साधासुधा मुलगा नाही. हा मुलगा बॉलिवूडचा एक मोठा सुपरस्टार बनला. या सुपरस्टारच्या प्रेमात पडलेल्या अभिनेत्रीने आयुष्यभर लग्नही केलं नाही. तुम्ही या अभिनेत्याला ओळखलंत का?

प्रसिद्ध अभिनेत्याचा बालपणातला फोटो, ओळखलंत का? या अभिनेत्याच्या प्रेमात पडलेल्या अभिनेत्रीने लग्न केलं नाही
प्रसिद्ध अभिनेत्याचा बालपणातला फोटो, ओळखलंत का?
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 6:50 PM

सोशल मीडियावर सध्या एका मुलाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो चांगलाच व्हायरल होतोय. हा फोटो व्हायरल होण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. कारण हा फोटो कुणी साध्यासुधा मुलाचा नाही. हा फोटो ज्या मुलाचा आहे त्या मुलाने एकेकाळात संपूर्ण बॉलिवूड गाजवलंय. शोले सारख्या प्रसिद्ध चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या मुलाला विसरणं हे बॉलिवूडला आणि प्रेक्षकांनाही शक्य होणार नाही. इतकं भारी काम या मुलाने आपल्या आयुष्यात केलं आहे. या मुलाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. तसेच प्रेक्षकांच्या मनात या मुलाने एक दरारा देखील निर्माण केलाय.

कधी एकेकाळी ‘शोले’ चित्रपटातला एक डायलॉग फार बोलला जायचा. लहान मुलांना झोपवण्यासाठी या हिंदी चित्रपटातला डायलॉग सर्रासपणे वापरला जायचा. ‘सो जा बेटा नहीं तो गब्बर आ जाएगा…’, हा डायलॉग आजही वापरला जातो. या डायलॉगमुळे आजही अनेकांचा थरकापही उडतो. आम्ही नेमकं कुणाबद्दल बोलतोय ते कदाचित तुमच्या आता लक्षातही आलं असेल. आम्ही फोटोतल्या ज्या मुलाबद्दल बोलतोय हा एक बॉलिवडूचा एक स्टार होता. फोटोतला मुलगा हा बॉलिवूडमधला सगळ्यात खतरनाक विलन बनला. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. या अभिनेत्याचं नाव होतं अमजद खान.

अमजद ‘त्या’ व्यक्तीचं खूप मन लावून ऐकायचे

अमजद खान यांचं गब्बरची भूमिका प्रचंड गाजली. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यांनी संवादफेकाचं कौशल्य नेमकं कुणाकडून आत्मसात केलं? त्यांना त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीबाबत चित्रपट दिग्दर्शक किंवा स्क्रिप्ट रायटरने काहीच शिकवलं नाही. तर त्यांनी आपल्या गावातील एका व्यक्तीकडे पाहून त्यांनी ती कला आत्मसात केली. अमजद खान यांच्या गावात एक कपडे धुनारा व्यक्ती होता. या व्यक्तीची बोलण्याची स्टाईल फार वेगळी आणि भारी होती. अमजद खान त्याच्या वागण्या-बोलण्याने प्रभावित झाले होते. अमजद त्या व्यक्तीचं खूप मन लावून ऐकायचे. त्यामुळे त्यांना जेव्हा गब्बरचा रोल मिळाला तेव्हा त्यांनी त्याच स्टाईलने संवादफेक केली. त्यांच्या स्टाईलचं रमेश सिप्पी यांनी चांगलं कौतुक केलं. पुढे गब्बरच्या बोलण्याची स्टाईलही प्रसिद्ध झाली.

अमजद खानवर ‘ही’ अभिनेत्री प्रचंड प्रेम करायची

अमजद खान यांनी शैला खान यांच्याशी लग्न केलं होतं. शैला खान महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अमजद खान यांना भाऊ म्हणून हाक मारायची. पण पुढे काही वर्षांनी अमजद खान आणि शैला यांचा विवाह झाला. दरम्यान, अमजद खान यांच्यावर एक अभिनेत्री प्रचंड प्रेम करायची. विशेष म्हणजे अमजद खान यांच्यासाठी ही अभिनेत्री आयुष्यभर एकटी राहिली. तिने अमजद खान यांच्या स्मरणात लग्नदेखील केलं नाही. ही अभिनेत्री राजा हिंदुस्तानी या चित्रपटात परदेसी परदेसी गाण्यात बंजारनच्या रोलमध्ये बघायला मिळाली होती. या अभिनेत्रीचं नाव कल्पना अय्यर असं होतं. कल्पना अय्यर अमजद खान यांच्यावर खूप प्रेम करायची. ती अमजद यांच्यावर इतकं प्रेम करायची की, अमजद यांचं निधन झाल्यानंतरही कल्पनाने लग्न केलं नाही.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.