एकाचे घमंड तोडले आता दुसऱ्याची बारी म्हणत सोशल मीडियावर बायकॉट पठाण ट्रेंड सुरू, शाहरुख खानला बसणार फटका?

| Updated on: Dec 13, 2022 | 10:50 PM

तब्बल 4 वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय.

एकाचे घमंड तोडले आता दुसऱ्याची बारी म्हणत सोशल मीडियावर बायकॉट पठाण ट्रेंड सुरू, शाहरुख खानला बसणार फटका?
Pathaan Movie
Follow us on

मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील गाणे रिलीज झाले आहे. शाहरुख खान नुकताच वैष्णो देवीच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी गेला होता. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान हा प्रचंड चर्चेत आहे. तब्बल 4 वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. यापूर्वी शेवटी शाहरुख खान हा झिरो या चित्रपटामध्ये दिसला होता. पठाण चित्रपट सध्या चर्चेत आहे. पठाणमधील रिलीज झालेले गाणेही अनेकांना आवडले असतानाच आता सोशल मीडियावर बायकॉट पठाण ट्रेंड सुरू झाला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांना हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू केला आहे. इतकेच नाहीतर दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान याच्या रिलीज झालेल्या गाण्याला देखील ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियावर अनेक युजर्स हे दीपिका आणि शाहरुख यांच्या गाण्यावर टीका करत म्हणत आहेत की, यांचे आता फॅमिली चित्रपट चालत नसल्यामुळे हे अशाप्रकारचे चित्रपट करत आहेत.

अनेकांनी तर गाणे पाहून दीपिका पादुकोणला टार्गेट केले असून तू असे गाणे कसे करू शकते, हे विचारले जात आहे. सोशल मीडियावर आता बायकॉट पठाण ट्रेंड जोरदार सुरू झालेला दिसत आहे.

एका युजर्सने कमेंट करत म्हटले आहे की, एकाचा घमंड तोडला आहे, आता याचा घमंड तोडायचा आहे. आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अशाच प्रकारचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू होता.

बायकॉट पठाण ट्रेंडचा नक्कीच चित्रपटाला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण आमिर खानचा लाल सिंह चड्ढा रिलीज होण्याच्या अगोदर असाच ट्रेंड सुरू होता आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.