Brahma Mishra Death | मित्रासोबत धमाल डान्स, ‘ललित’ फेम ब्रह्मा मिश्राचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
‘मिर्झापूर’ वेब सीरीजमधील ‘ललित’ या पात्रामुळे घराघरात प्रसिद्ध झालेल्या ब्रह्मा मिश्राच्या (Brahma Mishra) निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला.
मुंबई : ‘मिर्झापूर’ वेब सीरीजमधील ‘ललित’ या पात्रामुळे घराघरात प्रसिद्ध झालेल्या ब्रह्मा मिश्राच्या (Brahma Mishra) निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र, सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून त्याचा मृतदेह घराच्या बाथरूममध्ये पडून होता. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. ब्रह्मा मिश्राच्या मृत्यूनंतर त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या मित्रासोबत डान्स करताना दिसत आहे. हा त्याचा शेवटचा इन्स्टाग्राम व्हिडीओ होता. चाहते त्याची ही स्टाईल पाहून त्याला खूप मिस करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
हृदयविकाराच्या झटक्याने निधन!
ब्रह्मा मिश्रा याने 29 नोव्हेंबर रोजी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तो डॉक्टरांकडेही गेला होता. तेथून तो काही औषध घेऊन घरी परतला होत. पण, आता असे सांगितले जात आहे की त्याच दिवशी त्याने या जगाचा निरोप घेतला.
ब्रह्मा याला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो बाथरूममध्ये होता. त्याचा मृतदेह सलग तीन दिवस मुंबईतील वर्सोवा येथील घरात बाथरूममध्येच राहिला. सध्या मुंबई पोलीस त्याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करत आहे. जेणेकरून त्याच्या मृत्यूचे योग्य कारण कळू शकेल. वर्सोव्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिराज इनामदार म्हणाले की, आज दुपारी 12.30 वाजता पोलीस नियंत्रणाला एक फोन आला आणि त्यांनी सांगितले की, यारी रोडवर असलेल्या इनलक्स नगर सोसायटीच्या डी विंग 13 क्रमांकाच्या खोलीत दुर्गंधी येत आहे, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी डुप्लिकेट चावीने घर दरवाजा उघडला. पाहिले शौचालयाचा वास येत होता आणि शौचालयाचा दरवाजा उघडा होता, अभिनेत्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत शौचालयात होता, जो पूर्णपणे कुजलेला होता.
भोपाळचा ‘ब्रह्मा’
ब्रह्मा हा मूळचा भोपाळजवळील रायसेनचा होता. त्याने रायसेनमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन तो मुंबईत पोहोचला होता. त्याचा मुंबईतील प्रवास कधीच सोपा नव्हता. संघर्षाच्या दिवसांत आर्थिक संकटात असताना त्याचे वडील आणि मोठा भाऊ त्याच्यासाठी पैसे पाठवत असत. ब्रह्मा याने 2013 मध्ये आलेल्या ‘चोर चोर सुपर चोर’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. तो शेवट ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटामध्ये तापसी पन्नूसोबत दिसला होता.
ब्रह्माचे करिअर
‘मिर्झापूर’मधून प्रसिद्ध झालेल्या ब्रह्माला अनेक चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. ‘केसरी’, ‘हसीन दिलरुबा’, ‘मांझी’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटातही त्याने आपल्या अभिनयाची ताकद दाखवली होती. पण त्याच्या या प्रवासाचा शेवट इतका दुःखद होईल याची कल्पना कोणीच केली नव्हती.
हेही वाचा :
‘पाठक बाई’ दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, अतरंगी किस्स्यांची मैफिल रंगणार ‘हे तर काहीच नाय!’